गोंदिया शहर व तालुक्यात कठोर लॉकडाऊनची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:16+5:302021-05-16T04:28:16+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलीच जीवितहानी केली असून कित्येकांचे संसार उद‌्ध्वस्त केले आहेत. यात सर्वाधिक हानी गोंदिया ...

Need for strict lockdown in Gondia city and taluka | गोंदिया शहर व तालुक्यात कठोर लॉकडाऊनची गरज

गोंदिया शहर व तालुक्यात कठोर लॉकडाऊनची गरज

Next

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलीच जीवितहानी केली असून कित्येकांचे संसार उद‌्ध्वस्त केले आहेत. यात सर्वाधिक हानी गोंदिया शहर व तालुक्याची दिसत असून याचे कारण ही शहर व तालुक्यात लॉकडाऊनची धुडकावणूक होत असल्याने दिसत आहे. अशात आता भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता गोंदिया शहर व तालुक्यात कठोरतेने लॉकडाऊनचे पालन करण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलल्यास काहीच हरकत नाही.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजारांच्या घरात जात आहे. त्यातल्या त्यात दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला हादरवून सोडले असून कित्येकांचा जीव घेतला आहे. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ६३१ एवढी झाली आहे. कोरोनाचा कहर आता कमी होताना दिसत असला तरीही दररोज बाधितांची आकडेवारी वाढतच चालली आहे. तर मृत्युसत्रही सुरूच आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वाधिक रुग्ण व मृत्युसंख्या गोंदिया शहर व तालुक्यातील दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहरातील स्थिती बघता एवढ्या लॉकडाऊनमध्येही नागरिकांची अवाजवी कमी झालेली दिसून येत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरात राहणे गरजेचे असून महत्त्वाचे काम असल्याचे बाहेर पडण्यास हरकत नाही. मात्र शहरातील चित्र बघता कोरोनाने घातलेल्या धुमाकुळानंतरही काहीच भीती किंवा चिंता नागरिकांत दिसून येत नाही. हीच स्थिती तालुक्यातील ग्रामीण भागात असावी, म्हणूनच गोंदिया शहर व तालुक्यात बाधितांची संख्या सर्वात जास्त नोंदली जात आहे.

-------------------------------

कडक लॉकडाऊनची गरज

कोरोनावर आता वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन अंतर्गत आवश्यक त्या कारवाया केल्या जात आहेत. मात्र त्या पुरेशा दिसत नसून आता कठोर पाऊल उचलण्याची गरज भासत आहे. मागील वर्षाप्रमाणे आता प्रशासनाने कारवाया केल्यास नागरिकांना लॉकडाऊन काय ते कळणार. असे केल्यास नक्कीच कोरोना नियंत्रणात येणार यात शंका नाही.

Web Title: Need for strict lockdown in Gondia city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.