विषमुक्त नैसर्गिक शेती काळाची गरज

By admin | Published: April 18, 2016 04:12 AM2016-04-18T04:12:35+5:302016-04-18T04:12:35+5:30

विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक

Need for time-tested natural farming | विषमुक्त नैसर्गिक शेती काळाची गरज

विषमुक्त नैसर्गिक शेती काळाची गरज

Next

सालेकसा : विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती करुन भूमातेला वाचवित स्वत:चे जीवन नष्ट होण्यापासून वाचवू शकतो, असे प्रतिपादन नागपूरचे कृषितज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ. हेमंत चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते साकरीटोला येथे झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करीत होते.
शेतकरी संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते, कामठा येथील प्रगतिशील शेतकरी धनीराम भाजीपाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे कृषी विषयतज्ज्ञ हेमंत चव्हाण, चाचेर येथील प्रगतीशील शेतकरी विरेंद्र बरबटे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश बोहरे यांनी मांडले व नैसर्गिक शेतीच्या प्रशिक्षणाची गरज व महत्व सांगितले.
हेमंत चव्हाण आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, आज आपल्याला आमच्या तिन्ही मातेच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यात भूमाता, गोमाता आणि जन्मदात्रीचे संरक्षण करण्यासाठी जो कोणी सतत प्रयत्नशील राहील, त्याला जीवनात कधीच अपयश येणार नाही. परंतु दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत व्यक्ती आपल्या या तिन्ही मातांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्याला तसे परिणामही भोगावे लागत आहे.
विविध प्रकारचे कष्ट व वेदना सहन करीत आई आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून अथक प्रयत्न करते. तोच मुलगा पुढे जाऊन आपल्या आईला वाडीत टाकून निघून जातो व मागे वळून पाहत नाही. आईच्या दुधाला विसरुन व गाईच्या दुधाकडे दुर्लक्ष करुन बाजारातील नकली दुधाचा उपयोग करतो. त्यामुळे त्याची मानसिक वृत्ती विकृत झालेली असते. गोमातेबद्दल आजचा शेतकरीसुद्धा निर्दयी झालेला दिसतो व ती वृद्ध झाल्यावर कसायला विकून टाकतो. एका शेतकऱ्याने एका देशी गायची सेवा केली तर त्याला उत्तम प्रकारे नैसर्गिक शेती करण्यासाठी फार उपयोगी व महत्वाची ठरेल. रासायनिक खताचा वापर टाळून गोमूत्र आणि शेनापासून तयार झालेले खत शेतीत वापरले तर उत्तम व दर्जेदार पीक येईल व गाईच्या दुधाचे सेवन करणाऱ्याला आईचेसुद्धा महत्व कळेल. तसेच भूमातेलासुद्धा वाचविता येईल.
त्यांनी पदमश्री डॉ. सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र कोणकोणते याबद्दल सविस्तर सांगितले. रामरतन राऊत यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील शेतजमीन व तिचे उर्वरकतेबद्दल व गुण वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. चाचेरचे विरेंद्र बरबडे यांनी जमिनीची पोत टिकवून ठेवण्यासाठी धानाच्या शेतीबरोबरच बागायती फळाच्या शेतीचे महत्व सादर केले. याप्रसंगी काही स्थानिक शेतकऱ्यांनीसुद्धा आपले बरे-वाईट अनुभव कथन केले. कार्यक्रमात महिला शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. संचालन रघुनाथ चुटे यांनी केले. आभार सेवक बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश बोहरे, डॉ. रामेश्वर दोनोडे, चंद्रभान मुनेश्वर, सुनील फुंडे, पप्पू पठाण, राजकुमार थेर, तारकेश्वर ब्राम्हणकर, चंद्रकांत गजभिये, नामदेव दोनोडे, मुकेश रामटेके, परिम कोरे, मोहन दोनोडे, राजू भांडारकर, मुकेश फुंडे, चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Need for time-tested natural farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.