पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:33 PM2017-11-06T20:33:01+5:302017-11-06T20:33:39+5:30

झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.

Needs tree enrichment for environmental balance | पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देविजय रहांगडाले : शेतकºयांना धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
स्थानिक मनोरा येथील ग्रामपंचायत भवनामध्ये वृक्ष संवर्धन योजनेअंतर्गत शेतीमध्ये मोठी झाडे लावणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसरंक्षण युवराज, उपविभागीय अधिकारी तळपाते, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, तालुका उपनिबंधक प्रमोद हुमणे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ग्रामीण भागात आजही जळावू लाकडाकरिता झाडांची कत्तल केली जात आहे. या झाडांची कत्तल थांबावी म्हणून उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांचा जळावू लाकडांकरीता काही प्रमाणात उपयोग थांबलेला दिसून येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात डिपीडीसीच्या माध्यमातून ज्या शेतकºयांच्या शेतीमध्ये मोठ्या आकाराचे आंबा, वड, साग यासारखे झाडे आहेत, अशा शेतकºयांना प्रोत्साहनपर आर्थिक बक्षीस देणे हे कौतुकास्पद आहे.
यामुळे वृक्षांची कत्तल थांबण्यास मदत होवून शेतकरीसुध्दा याकडे विशेष लक्ष देईल व पर्यावरणीस संतुलन राखण्याकरीता मदत होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला क्षेत्र सहायक बी.सी.चव्हाण, क्षेत्र सहा. एन.पी.वैद्य, एस.डी.उके, डी.एम.बुरेले, आर.आर.पठाण, सरपंच राजेश पेशने, कृषी सहा. एल.के.रहांगडाले, निरज सोनेवाने, गंगाधर तिडके व गावकरी उपस्थित होते.

झाडे लावणाºयांना मदत
कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शेतात जुन्या झाडांचे सवंर्धन करणाºया मनोरा येथील कविता गणवीर, बाबुलाल गणवीर, वासुदेव कावळे, गोपाळा कावळे, कुसन आगाशे, सोहन आगाशे, मनोज तिडके यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

Web Title: Needs tree enrichment for environmental balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.