नीरज वर्मा गोंदियाचे रॉकेट मॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:49 PM2019-07-30T21:49:39+5:302019-07-30T21:50:18+5:30

श्रीहरिकोटा येथील‘इस्त्रो’द्वारे चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी शहरातील गड्डाटोली येथील रहिवासी नीरज वर्मा यांना सपत्नीक आंमत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आमंत्रण स्विकारुन २२ जुलैला श्रीहरिकोटा येथे उपस्थित राहून चांद्रयान-२ च्या प्रेक्षपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

Neeraj Verma Gondia's Rocket Man | नीरज वर्मा गोंदियाचे रॉकेट मॅन

नीरज वर्मा गोंदियाचे रॉकेट मॅन

googlenewsNext
ठळक मुद्देचांद्रयान प्रेक्षपणाकरिता दिले होते निमंत्रण : शहरवासीयांसाठी गौरवाची बाब

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : श्रीहरिकोटा येथील‘इस्त्रो’द्वारे चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी शहरातील गड्डाटोली येथील रहिवासी नीरज वर्मा यांना सपत्नीक आंमत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आमंत्रण स्विकारुन २२ जुलैला श्रीहरिकोटा येथे उपस्थित राहून चांद्रयान-२ च्या प्रेक्षपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.ही बाब गोंदिया शहरवासीयांसाठी गौरवाची आहे.
नीरज वर्मा हे गोंदिया येथील रहिवासी असून त्यांनी टाकाऊ वस्तू आणि प्लॉस्टिकपासून रॉकेटचे मॉडेल (जीएसएलव्ही एमके ३) तयार केले होते. याच मॉडेलची दखल घेत त्यांना श्रीहरिकोटा येथे आंमत्रित करण्यात आले. यामुळे गोंदियाचे रॉकेट मॅन म्हणून सुध्दा त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांचा श्री चित्रगुप्त कायस्थ समाजातर्फे सत्कार करण्यात आला. श्रीहरिकोटा येथून नुकतेच चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रेक्षपेणाचा विद्यार्थ्यांना सुध्दा थेट अनुभव घेता यावा यासाठी निरज वर्मा हे ७० विद्यार्थ्यांना आपल्यासह घेवून गेले होते. निरज वर्मा यांना इस्त्रोचे प्रक्षेपणाकरिता निमंत्रण येणे ही समाज व गोंदियावासीयांसाठी गौरवाची बाब आहे.
समाजाच्या वतीने रविवारी योगेश वर्मा यांच्या निवासस्थानी येथे सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी कायस्थ समाजाचे अध्यक्ष कमलेश श्रीवास्तव होते. यावेळी समाजाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अमित श्रीवास्तव यांनी केले तर आभार कमलेश श्रीवास्तव यांनी मानले.
कार्यक्रमासाठी वीरेंद्र वर्मा, रामकुमार श्रीवास्तव, सचिव अमित श्रीवास्तव, सहसचिव प्रदिप श्रीवास्तव, रतन श्रीवास्तव, सदस्य रमेश श्रीवास्तव, मनोज खरे, संजय वर्मा, मनिष श्रीवास्तव, मोना श्रीवास्तव, अंजू वर्मा यांनी सहकार्य केले.

Web Title: Neeraj Verma Gondia's Rocket Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.