आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या भाच्याचा घाटात बुडून मृत्यू

By नरेश रहिले | Published: February 7, 2024 07:22 PM2024-02-07T19:22:01+5:302024-02-07T19:22:32+5:30

रजेगाव घाटावरील घटना: पिसाळलेला कुत्रा चावल्याने आत्याचा झाला होता मृत्यू

nephew who went for pindada drowned in the ghat | आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या भाच्याचा घाटात बुडून मृत्यू

आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या भाच्याचा घाटात बुडून मृत्यू

नरेश रहिले, गोंदिया: आत्याच्या पिंडदानासाठी रजेगाव घाटावर गेलेल्या भाच्याचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रजेगावच्या बाघनदी घाटावर घडली. भूपेंद्र भरत बागडे (२०) रा खमारी ता. गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे.

खमारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ३० जानेवारी गावातीलच मंजू लक्ष्मीनारायण गायधने यांचा मृत्यू झाला होता. मंजू ह्या मृतक भुपेंद्रच्या आत्या असल्याने त्यांच्या पिंडदानासाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घरून वाहनाने निघाले होते. पिंडदान करण्यासाठी गेलेले काही लोक आंघोळ करण्यासाठी बाघनदीच्या पाण्यात उतरले. तर भूपेंद्र हा दगडावर बसून होता. परंतु दगडावर उभा होताच त्याचा पाय घसरल्याने त्याचे संतुलन ढासळले. यात डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. परिसरातील ढिवरांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: nephew who went for pindada drowned in the ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.