पंचायत समिती सदस्यांचे नियोजनशून्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 01:10 AM2017-03-30T01:10:30+5:302017-03-30T01:10:30+5:30
जि.प.अध्यक्ष येण्याआधीच अधिकाऱ्यांना दीप प्रज्वलन करुन घेण्याची घाई का झाली? प्रशिक्षकच हजर नसताना
भोंगळ कारभार : जिल्हाभरातून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची नाराजी
पदाधिकाऱ्यांनाही महत्त्व नाही
जि.प.अध्यक्ष येण्याआधीच अधिकाऱ्यांना दीप प्रज्वलन करुन घेण्याची घाई का झाली? प्रशिक्षकच हजर नसताना अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिकात पूर्ण करून पं.स.सदस्यांना ताटकळत का ठेवले? अध्यक्ष हे जि.प.चे सर्वोच पद असताना त्यांचे स्वागत करण्यासाठीही संबंधित अधिकारी हजर नसणे हा त्यांचा अपमान नाही का? अशी कुजबूज पं.स.सदस्यांमध्ये सुरू होती.
आम्हाला बोलावलेच कशाला?
जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार व कर्तव्य या विषयावर बोलण्यासाठी गडचिरोलीच्या माजी जि.प. सदस्य कुसूम आत्राम यांनी थोडीफार माहिती दिली. मात्र नंतर विषयांतर होऊन त्यांचे मार्गदर्शन दुसरीकडे भरकटले. नंतर जिल्हा परिषदेचे उत्पन्न व खर्चाच्या बाबी विषयावर बोलण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला. मात्र त्या प्रतिनिधीकडे अपुरी माहिती असल्याचे जाणवल्याने त्यांना सदस्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी अनेक सदस्यांनी बाहेर जाणे पसंत केले. अशा नियोजनशून्य कारभारावर नाराज झालेल्या पं.स.सदस्यांनी शेवटी तेथून काढता पाय घेत आम्हाला अशा प्रशिक्षणाला बोलावलेच कशाला? अशी प्रतिक्रिया देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.