उमेदवारांनी शोधल्या प्रचाराच्या नवीन क्लृप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:21 AM2021-01-10T04:21:59+5:302021-01-10T04:21:59+5:30

केशोरी : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये केशोरी ग्रामपंचायतीचा समावेश असून याठिकाणी १३ जागांसाठी २६ ...

New campaign tricks discovered by candidates | उमेदवारांनी शोधल्या प्रचाराच्या नवीन क्लृप्त्या

उमेदवारांनी शोधल्या प्रचाराच्या नवीन क्लृप्त्या

Next

केशोरी : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये केशोरी ग्रामपंचायतीचा समावेश असून याठिकाणी १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. गावातील प्रत्येक वॉर्डात राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. गावातून फिरण्याच्या प्रचार पद्धतीला बगल देत ॲन्ड्राॅईड मोबॉईलद्वारे व्हाॅटसॲपच्या माध्यमातून प्रचार करणे जोरात सुर झाले आहे. आपआपली उमेदवारी गावाच्या विकासासाठी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुण सुशिक्षित वर्ग निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ॲन्ड्रॉईड मोबाईलद्वारे व्हाॅटसॲप माध्यमातून आपल्या प्रचाराचा धुराळा सुरू केला आहे. आपल्या जवळचा कोण आणि दूरचा कोण या अंदाजाला दूर सारत प्रत्येकाने आपल्या चिन्हासह व्हॉटसॲपच्या माध्यमातून प्रचार कार्याला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. आपआपल्या वॉर्डातील मतदारांची संख्या जोडून निवडणुकीत निवडून येण्याच्या खात्रीने सामाजिक संबंधाचेसुद्धा गणित जोडत आहेत. आम्ही फक्त गावविकासाकरिता ग्रामपंचायत निवडणूक लढवित असल्याची भूमिका व्हॉटसॲपच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शहराप्रमाणे खेड्यातसुद्धा सर्वांच्या हातात मोबाईल आल्यामुळे अनेक उमेदवारांना आपला प्रचार करणे सोपे झाले आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसतसा निवडणूक प्रचाराला वेग येत असून काही राजकीय मंडळी या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणत्या वॉर्डातून कोण उमेदवार निवडून येईल याचा अंदाज बांधत आहेत.

....

खर्चावर नियंत्रण

सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने कोणताही उमेदवार फारसा खर्च करताना दिसून येत नाही. यामुळे निश्चित निवडणुकीमध्ये होणाऱ्या अमाप खर्चावर आळा बसला आहे हे निश्चित. खर्च करण्यासंदर्भात मागे-पुढे बघत असल्याचे दिसून येत आहे. या गावामध्ये अपक्ष उमेदवाराला थारा नसून सरळसरळ भाजप विरोधात दोन्ही काँग्रेस शिवसेनासह उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभी असल्याचे स्पष्ट होत आहे हे निश्चित.

Web Title: New campaign tricks discovered by candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.