केटीएस रूग्णालयासाठी नवीन सिटी स्कॅन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:33 AM2018-10-27T00:33:17+5:302018-10-27T00:34:41+5:30
येथील केटीएस रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी २.३५ कोटींचा निधी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. तसेच मशिनसाठी शासकीय हाफकीन नामक संस्थेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील केटीएस रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी २.३५ कोटींचा निधी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. तसेच मशिनसाठी शासकीय हाफकीन नामक संस्थेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
यामुळे लवकरच केटीएस रूग्णालयातील नवीन सिटी स्कॅन मशीनचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील ८-१० वर्षांपूर्वी येथील केटीएस रूग्णालयात आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने सिटी स्कॅन मशिन लावण्यात आली होती.
मात्र मशीनची योग्य देखभाल-दुरूस्ती न झाल्याने मशीन नादुरूस्त होत गेली. त्यातच मशिन दुरूस्तीचे पैसे न दिल्याने सुमारे ६ महिने मशिन बंद पडून राहिली. हा विषय आमदार अग्रवाल यांनी राज्य शासनापर्यंत नेला व मशीनची दुरूस्ती करवून घेतली. तसेच रूग्णालयात नवीन मशीन लावण्याचे ठरवून घेतले.
त्यानुसार, त्यांनी ३ कोटी रूपयांच्या नवीन मशीनसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६५ लाख रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र उर्वरित निधीच्या अभावामुळे मशीन लागली नाही.
अशात आमदार अग्रवाल यांनी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उर्वरीत २.३५ कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे शासकीय हाफकीन कंपनीने मशिनसाठी निविदा प्रक्रीयाही सुरू केली आहे.
त्यामुळे आता लवकरच केटीएस रूग्णालयातील नवीन सिटी स्कॅन मशीनचा मार्ग मोकळा झाला आहे.