कोरोना बाधितांचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:17+5:30

सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत शहरातील प्रत्येक भागातच कोरोनाचे रुग्ण असल्याने संपृूर्ण शहरालाच कोरोनाचे विळखा घातल्याचे चित्र आहे.

New high for corona sufferers | कोरोना बाधितांचा नवा उच्चांक

कोरोना बाधितांचा नवा उच्चांक

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी ९२ बाधितांची नोंद : गोंदिया तालुका झाला कोरानाचे हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा विळखा जिल्ह्यात दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. कोरोना बाधितांचा आलेख दररोज वाढत असून सोमवारी (दि.९५) एकाच दिवशी ९३ कोरोना बाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक झाला असून मागील ६ महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा होय. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत शहरातील प्रत्येक भागातच कोरोनाचे रुग्ण असल्याने संपृूर्ण शहरालाच कोरोनाचे विळखा घातल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आरोग्य विभागाचा गलथान कारभार देखील पुढे येत आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याची ओरड सुरू आहे. रविवारी आमगाव तालुक्यातील २ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण २० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. मार्च ते जून महिन्यात जिल्ह्यात केवळ २८८ कोरोना बाधित आढळले होते. तर एकट्या आॅगस्ट महिन्यात ११९४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ऑगस्ट महिना कोरोना विस्फोटाचा ठरल्याने चिंतेत भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत १४८५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ९४४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

ऑगस्ट महिन्यात वाढला कोरोनाचा आलेख
जिल्ह्यात मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण १४८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले.यापैकी २८८ बाधित मार्च ते जुलै दरम्यान आढळले. तर ११९४ कोरोना बाधित एकट्या ऑगस्ट महिन्यात आढळले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून याला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांनावर कुठलाच वॉच नसून स्थापन केलेले सीमा तपासणी नाका केवळ नाममात्र ठरत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

आत्तापर्यंचा सर्वाधिक आकडा
जिल्ह्यात २७ मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना नवीन कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. यानंतर मे महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक २७, जून महिन्यात ४० आणि ऑगस्ट महिन्यात ८१ आणि ३१ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ९३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होय.

Web Title: New high for corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.