दहावी, बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिकऐवजी नव्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:20+5:302021-03-24T04:27:20+5:30

यावर्षी होऊ घातलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोविड-१९ च्या अनुषंगाने मोठा बदल घडून आला असून, संबंधित परीक्षा केंद्र ...

New instructions instead of demonstrations of the tenth, twelfth boards | दहावी, बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिकऐवजी नव्या सूचना

दहावी, बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिकऐवजी नव्या सूचना

Next

यावर्षी होऊ घातलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोविड-१९ च्या अनुषंगाने मोठा बदल घडून आला असून, संबंधित परीक्षा केंद्र प्रवेशित शाळाच असणार आहे. बारावी विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आली आहे. दहावीतील विद्यार्थ्यांचे श्रेणी व तोंडीसह अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित शाळांना बहाल करण्यात आले आहे. दहावीच्या लेखी परीक्षा आटोपल्यानंतर शाळा अंतर्गत परीक्षा घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांना कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षार्थ्यांना पाण्याची बाॅटल, सॅनिटायझर, मास्क सोबत ठेवावा लागणार असून, गर्दी होणार नाही याची शाळांना दक्षता घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक काढले आहे.

Web Title: New instructions instead of demonstrations of the tenth, twelfth boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.