वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय नवीन शोध अशक्य

By admin | Published: January 22, 2017 01:03 AM2017-01-22T01:03:35+5:302017-01-22T01:03:35+5:30

वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात.

New research without scientific approach is impossible | वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय नवीन शोध अशक्य

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय नवीन शोध अशक्य

Next

उल्हास नरड : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
अर्जुनी मोरगाव : वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हाच वैज्ञानिक शोध लागतात. बदलत्या शैक्षणिक क्रांती व विचार प्रवाहानुसार पाठ्यपुस्तके बदलली पाहिजेत. नवनवीन शोध लागले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासल्याशिवाय नवनवीन शोध लागणार नाहीत, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी केले.
ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी के.बी. बोपचे यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स.चे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार होते.
यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, तेजूकला गहाणे, मंदा कुंभरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, शिक्षण विस्तार अधिकारी एम.
एस. मोटघरे, अहिल्या खोब्रागडे, वाय.आर. लंजे, मुख्याध्यापक राजगिरे, सुनिता हुमे, प्राचार्य डी.के. मस्के, शाळा समिती सदस्य सिद्धार्थ टेंभुर्णे उपस्थित होते.
नरड पुढे म्हणाले, येत्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा उत्कृष्ट होतील. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. यात कुठेही कमी पडता कामा नये. ग्रंथ महोत्सवात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. वाचन आनंद प्रेरणा दिनाची संकल्पना उत्कृष्ट आहे. हा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील शाळांत उत्कृष्टपणे राबविण्यात आला. हा पॅटर्न महाराष्ट्र शासनाने स्वीकारुन राज्यात सुरू करण्याचे परिपत्रक काढले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने नजीकच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनी बघण्यासाठी आवर्जुन आणावे असे निर्देश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या एकाच उपक्रमाची निवड करुन संपूर्ण कौशल्य पणाला लावावे व नैपूण्य प्राप्त करावे असा संदेश दिला.
के.बी. बोपचे यांनी सांगितले की, विज्ञानाची प्रगती गं्रथातून झाली. ग्रंथ वाचनाने नवीन दृष्टी तयार होते.
ग्रंथ हे आयुष्यातील परिवर्तनाचे माध्यम आहे. ग्रंथ वाचनाने ज्ञानवृत्ती होते. ज्ञान ग्रंथातूनच मिळते. ग्रंथ हे माणसाचे सोबती आहेत. केवळ संशोधनाचा उपयोग घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती बाळगून संशोधनाच्या मुळाश्ी गेले पाहिजे. स्वत:चे टॅलेंट प्रगत करा. जीवनात टॅलेंट प्रदर्शीत करण्याचे अनेक क्षण प्राप्त होतात त्याचा लाभ घेतल्यास निश्चितच जीवनात संधीचे सोने होईल असा उपदेश केला.
एन.आर. जमईवार म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अधोगतीसाठी करु नका. आपण भावी पीढीचे वैज्ञानिक आहात.
केवळ अर्थार्जनासाठी शिक्षण घेऊ नका. स्वत: वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती जोपासून केवळ विज्ञानातच नव्हे तर कृषी, शिक्षण व समाजकारण क्षेत्रात प्रगती करा. आपल्या भाषणातून त्यांनी शौचालयाचा वापर सर्वच घरात करावा. कॅशलेसचा वापर करा आणि जीवन सुखकर होण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्व फुलवा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस. मोटघरे, संचालन आर. डी. कस्वाल यांनी केले. टी.बी. भेंडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: New research without scientific approach is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.