रिवा-नागपूर व जबलपूर-चांदाफोर्ट नवीन गाडी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:24+5:302021-01-21T04:27:24+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता सर्वत्र स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागानेसुद्धा हळूहळू रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता सर्वत्र स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागानेसुद्धा हळूहळू रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जबलपूर मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर झाल्यावर आता या मार्गावरून गाड्या सुरू केल्या जात आहेत. चेन्नई-गया ही गाडी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर रिवा-नागपूर व जबलपूर चांदाफोर्ट या दोन नवीन गाड्या सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रिवा-नागपूर ही गाडी सायंकाळी ५.२० वाजता जबलपूरवरून सुटणार असून, नैनपूर, बालाघाटमार्गे गोंदिया येथे सकाळी ५.१५ पोहोचणार आहे. त्यानंतर परत हीच गाडी गोंदियावरून रात्री ९.३० वाजता सुटणार असून, ती जबलपूरला सकाळी ७.३० वाजता पोहोचेल, तर जबलपूर-चांदाफोर्ट ही गाडी जबलपूरवरून सकाळी ५.१५ वाजता सुटणार असून, बालाघाटमार्गे बालाघाटवरून गोंदियाला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल, तर दुपारी १.३० वाजता चांदाफोर्ट स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर हीच गाडी चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरून दुपारी २.३० वाजता सुटून गोंदिया येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल आणि त्यानंतर ही गाडी जबलपूरसाठी रवाना होणार आहे. या दोन्ही नवीन गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. डेली रेल्वे मूवर्स असोसिएशनने यासाठी रेल्वे विभागाचे आभार मानले आहेत.