उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

By Admin | Published: June 11, 2017 01:14 AM2017-06-11T01:14:05+5:302017-06-11T01:14:05+5:30

विजय घावटे: ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवड्याचा समारोप

New technology required to increase productivity | उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोडगावदेवी : भात पिकाचे क्षेत्र जास्त असल्याने, रोग किडींचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी वेळीच खबरदारी घेऊन जागरूक राहणे आवश्यक आहे. मजुरांची वानवा व वाढती मजुरी लक्षात जेता यांत्रिकी पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन घेत असताना रासायनिक खते व औषधांचा प्रमाण वाढणार नाही याकडे डोळेझाड करता येणार नाही. शेतामधून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी केले आहे.
अर्जुनी-मोरगाव येथे आयोजीत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवाड्याच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी रतिराम राणे, कुसन झोळे उपस्थित होते.
सर्वप्रथम आधुनिक कृषी जनक डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडाच्या समारोप समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना घावटे यांनी, आजघडीला नियोजनाअभावी शेतामधून मनाजोगे उत्पन्नच घेता येवू शकत नाही. ठराविक वेळी शेतीची मशागत करण्यात शेतकरी बांधवांनी प्राथमिक देणे आवश्यक आहे. नैराश्यमय विचार सोडून शेती केल्यास निश्चितपणे फलदायी ठरणारी शेती आहे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
येत्या २०२२ सालापर्यंत शेती उत्पादन दुप्पट करणे असा कृषी विभागाचा माणस असल्याचे सांगुन ते पुढे म्हणाले, कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटाने रोवणी यंत्र घेण्यासाठी पुढे यावे. जमिनीचे माती परिक्षण केल्यास शेतीची सुपिकता समजू शकते. त्यानुसार खतांची मात्रा किती द्यावी याचा नेमका अंदाज आपणास येवू शकतो. प्रत्येकाने शेतीची आरोग्य पत्रिका बनविण्यासाठी पुढे यावे. कमी खर्चामध्ये जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारे भाजीपाला, फळबाग यासारखे पिके घेण्याची तत्परता दाखविणे आज गरजेचे झाले आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय यासारखे शेतीपुरक व्यवसायाची कास धरावी. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उत्पादित शेतमालाची साठवणूक करून ठेवावी. त्यासाठी साठवणूक गृह बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
सभापती शिवणकर यांनी, शेती पाण्याशिवाय करताच येवू शकत नाही. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर जात आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कमीत कमी खर्चाची शेती करावी. कर्जबाजारीचा आव आणुन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून नये. जिवन अनमोल असून आलेल्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण करावी असे मत व्यक्त केले. जिल्हा कृषी अधिकारी इंगळे यांनी, शेतकऱ्यांनी पीक वीमा काढणे आवश्यक आहे. धानाची लागवड श्री पद्धतीने करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी चंद्रिकापुरे व तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संचालन विलास कोहाडे यांनी केले. प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी एन.एम. मुनेश्वर यांनी मांडले. आभार मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, पी.बी. ठाकुर, बी.टी. राऊत, अविनाश शहुकरे, मसराम, एन.आर. मेश्राम, भारती येरणे, कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: New technology required to increase productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.