तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:26 AM2021-03-15T04:26:50+5:302021-03-15T04:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची कार्यकर्ता सभा तसेच तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार सोहळा शुक्रवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची कार्यकर्ता सभा तसेच तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार सोहळा शुक्रवारी (दि. १२) येथील नगर परिषद सभागृहात पार पडला. यावेळी नागरिकांनी तालुक्यातील विविध समस्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मांडल्या. खासदार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सभेला माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार खुशाल बोपचे, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, महिला तालुकाध्यक्ष अंजली बिसेन, टिकाराम मेंढे, सुनील ब्राह्मणकर, संगीता दोनोडे, उषा हर्षे, मीना फुंडे, शीला चुटे, नरेश्वरी गौतम, माया सोनवणे, त्रिवेणी पटले, प्रशांत बहेकार, भोजराज सोनवणे, पुरूषोत्तम चुटे, रामचंद्र ठाकरे, विनोद बोरकर, गिरीश पटले, अनिल फुंडे, उदेलाल गौतम, सेवकराम डोये, विजय भांडारकर, टिकाराम भांडारकर, गणपत फुंडे उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी कामठा-आमगाव-रावणवाडी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत माहिती दिली. या रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळूनही त्याचे अंदाजपत्रक शासनाकडे ६ महिन्यांपासून धूळखात असून, तांत्रिक मान्यतेकरिता काम थांबले आहे. त्याला गती देण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना आपल्या स्तरावरून कळवावे, अशी मागणी केली. तर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंदाजे ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, तोपर्यंत दुरुस्तीचे काम मंजूर करून काम त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.