पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात ठरणार पुढील दिशा
By admin | Published: September 25, 2016 02:34 AM2016-09-25T02:34:09+5:302016-09-25T02:34:09+5:30
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने रविवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता कामगार भवन येथे जिल्हा ...
गोंदिया : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने रविवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता कामगार भवन येथे जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाला आयटकचे सचिव शिवकुमार गणवीर, राज्य संघटक विनोद झोडगे, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रूपये मासिक वेतनाचा निर्णय त्वरीत काढावा, केंद्र व राज्य शासन मिळून प्रतिदिन ३५० रूपये वेतन निश्चीत करावे, कामगार कायदे लागू करावे, थकीत असलेले वेतन त्वरीत देण्यात यावे, कामावरून कमी करण्याची पद्धत बंद करावी, कमी केलेल्या महिलांना त्वरीत कामावर घ्यावे, कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ११ महिने कामावर घेण्याचे अनुबंध पत्र लिहून घेणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, स्वयंपाकगृहाशिवाय शाळा स्वच्छतेची अतिरीक्त कामे करवून घेणाऱ्या मुख्याध्यापक व संबंधितांवर कारवाई करावी आदि विषयांवर आंदोलनाचा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.
अधिवेशनात जास्तीत जास्त शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष संगीता तांडेकर, महासचिव करूणा गणवीर, रेखा डोंगरवार, उषा मेश्राम, नंदा आदमने, ललिता राऊत, निर्मला बोरकर, सिंधू शहारे, धनू उईके, गीता नागोसे, कौशल खांडेकर, रेखा मेश्राम, मंगला ठाकरे, नितू आगडे आदिंनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)