तिरोडा परिसरात रात्रीकालीन देहव्यवसाय

By admin | Published: June 15, 2015 12:46 AM2015-06-15T00:46:03+5:302015-06-15T00:46:03+5:30

तिरोडा परिसरातील काही गावांचा परिसर देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध होत आहे. अदानी पॉवर प्रोजेक्टलगतच्या...

Night-time hospitality in Tiroda area | तिरोडा परिसरात रात्रीकालीन देहव्यवसाय

तिरोडा परिसरात रात्रीकालीन देहव्यवसाय

Next

बाहेरगावातून येतात तरुणी : नेण्याची व सोडण्याची स्वतंत्र व्यवस्था
काचेवानी : तिरोडा परिसरातील काही गावांचा परिसर देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध होत आहे. अदानी पॉवर प्रोजेक्टलगतच्या परिसरातील ७ ते १० कि.मी. जंगल परिसरासोबतच काही निवडक ठिकाणी देहव्यवसाय चालत असल्याच्या चर्चेला ऊत येत आहे. एवढेच नाही तर बाहेरगावाहून मुलींना बोलावून सकाळ होण्यापूर्वी परत पाठविल्या जात आहे. हा प्रकार परिसरातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
काचेवानी रेल्वे स्टेशन परिसर, अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या वसाहतीच्या मार्गावर रात्रीला बाहेरुन येणारे युवक युवतींना घेऊन चाळे करीत असल्याचे परिसरातील अनेकांनी प्रत्यक्ष पाहीले आहे. देहव्यवसाय करणाऱ्या तरुणी रेल्वे किंवा रस्ता मार्गाने तिरोडा, काचेवानी, गंगाझरी आणि सर्वाधिक गोंदिया स्थानकात उतरतात. संपर्कात असणारे तरुण गाड्या घेवून जातात आणि त्यांना हवे तिथे किंवा सुरक्षित ठिकाणी नेतात आणि सकाळ होण्यापूर्वी त्यांना रेल्वे स्थानकावर सोडतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
काही स्थानिक बांधकाम ठेकेदार अधिकाऱ्यांना खुश करण्याकरिता तरुणी पुरविण्याच्या कामात सहभागी असल्याचा चर्चा परिसरात आहेत. काही तरुणी व महिला नागपूर आणि रायपूरच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या खूप दूर अंतरावरून येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. प्रवास करताना त्या तरुणी स्कार्फने चेहरा बांधतात आणि गाडीत बसल्यानंतर काचेतून ओळख करता येत नाही. याचाच फायदा घेत हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे.
देह व्यवसायात संलग्न असणाऱ्या आणि आॅर्डरवर येणाऱ्या तरुणी व महिलांना सुरक्षित स्थळी आणल्या जाते आणि सुरक्षितपणे सोडल्या जाते.
स्वत:चा परिवार असल्याचे समजून कोणी संशयाने त्यांच्याकडे पाहण्याचे टाळतात. यापूर्वी तिरोडा जंगल परिसरात ‘लैला-मजनूंच्या जोड्या वावरताना अनेक नागरिकांनी पाहिल्या. काही लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून पैसे उकळून तर काहींनी त्यांची अब्रू लुटल्याच्या घटना घडल्या. आजही जंगल परिसरात हे प्रकार सुरू असले तरी याचे प्रमाण कमी झाले आहे.
काचेवानी रेल्वे परिसर ते स्थानकाच्या बाहेरील भागाकडे काही ठिकाणी देहव्यवसायाशी संबंधित महिला बाहेर गावावरून येणाऱ्या तरुणीला सुरक्षित ठेवतात आणि दिवस निघण्यापूर्वी रवाना करतात. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणी रात्री ९ किंवा ११ च्या गाडीने येतात आणि पहाटेच्या टाटानगर-इतवारी गाडीने नागपूरच्या दिशेने परत जातात. याची माहिती परिसरातील नागरिकांना आहे, परंतु नागरिक काहीही करण्यास असमर्थ आहेत. (वार्ताहर)

गावखेड्यातील नागरिक हतबल
अदानी पॉवर स्टेशनच्या ेपरिसरातील काही गावखेड्यात या देहव्यापाराच्या चर्चा अनेक नागरिकांना माहित आहे. याचा वाईट परिणाम पुढील पिढीवर तर होणार नाही, अशा चिंतेत सुज्ञ नागरिक आहेत. अनेकदा हा प्रकार काही लोक उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही काही करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन, तसेच पोलीस खात्याच्या गुप्तचर विभागाने सतर्क राहावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
स्थानकावर तपासणीची व्यवस्था हवी
देह व्यवसायाशी संलग्न असणाऱ्या तरुणी आणि महिला सायंकाळी हजर होवून पहाटे किंवा सकाळी अदृश्य होतात. रायपूर-नागपूर, छत्तीसगड एक्सप्रेस, इतवारी दुर्ग मेमू, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, अहमदाबाद-हावडा, इतवारी-डोंगरगड, इतवारी-टाटानगर यासह अन्य गाड्यांतून तसेच रस्ता मार्गाने येणाऱ्या तरुणींना गाडीतून नेण्याची व्यवस्था केली जाते. रात्रीला आपला शौक पूर्ण करुन त्यांना पुन्हा स्टेशनवर सोडले जाते. याची माहिती पोलिसांना आहे. पण ते दुर्लक्ष करतात. वास्तविक सायंकाळी ६ वाजेनंतर सर्व तरुणी किंवा संशयास्पद महिलेचे ओळखपत्र तपासण्याची सक्ती करणे तसेच पारिवारिक पुरावे तपासण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. याकडे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावर तपासणीची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Night-time hospitality in Tiroda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.