दहापैकी नऊ जणांना बायकोचा मोबाईल नंबर आठवत नाही.......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:02+5:302021-07-10T04:21:02+5:30
गोंदिया : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे मनुष्य हा बऱ्याच प्रमाणात आता यंत्रांवर अवलंबून राहत आहे. या गोष्टींचा ...
गोंदिया : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे मनुष्य हा बऱ्याच प्रमाणात आता यंत्रांवर अवलंबून राहत आहे. या गोष्टींचा त्याचा जीवनशैली आणि काहीसा आरोग्यावरसुद्धा परिणाम होत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे तर अनेकांना पूर्वी मुखपाठ असणारे नंबर आता आठवण राहत नसल्याचे दिसून येते. एकंदरीत या बदलांचा माणसाच्या स्मरणशक्तीवर कितपत होतो आहे याचा रिॲलिटी चेक ‘लाेकमत’ने गोंदिया शहरातील गांधी चौक, गोरेलाल चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, सिव्हिल लाईन परिसरातील काही व्यक्तींशी संपर्क साधला याची चाचणी करून पाहली. यात अनेकांना आपल्या पत्नीचा आणि मुलाचादेखील मोबाईल नंबर आठवण नसल्याची बाब पुढे आली तर काही गृहिणींना नवऱ्याचा मोबाईल नंबर पाठ नव्हता. मात्र, याउलट घरातील लहान मुलांना त्यांच्या आई-वडील आणि आजी आजोबांचासुद्धा नंबर पाठ आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी यावर मत मांडताना नागरिक आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करत नाही. त्यामुळे हा प्रकार घडतो. अद्यावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक झाला मात्र आता तो बऱ्याच गोष्टींसाठी परावलंबी झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
....................
लोकमत गोंदिया
- बाहेरगावावरून येताना गाडी पंक्चर झाली व मोबाईल बंद पडला. घरी फोन लावायचा होता पण पत्नीचा मोबाईल नंबरच आठवत नव्हता.
- मला माझा आणि माझ्या पत्नीचा नंबर पाठ आहे.
- एका कार्यक्रमात माझा मोबाईल बंद पडला. घरी फोन लावायचा होता पण पत्नीचा नंबरच आठवत नव्हता.
-मला माझ्या कार्यालयातील प्रमुखांचा नंबर आठवण आहे पण पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नाही.
.....................
कोट
लहान मुलांना आपण वारंवार सांगून नंबर सांगून पाठ करून घेतो, त्यामुळे शाॅर्ट मेमरी लॉगटर्म मेमरीमध्ये परावर्तित होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे अनेक जण परावलंबी झाले आहेत, त्यामुळे ते आपल्या शाॅर्टटर्म मेमरीचा वापर करत नाहीत.
- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ.
..................
तरुणांपासून वृध्दापर्यंत सारेच सारखे
-मोबाईल आल्यापासून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.
-पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेस प्रत्येकांना कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे नंबर पाठ राहायचे.
- आता नाव आठविल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बाॅक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. त्यातून रिकाॅल मेमरी कमी होत आहे. त्यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर माेबाईल पाहल्याशिवाय आठवत नाही.
...............................
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
मला माझा, माझ्या पतीचा आणि मुलीचा नंबर पाठ आहे. मात्र, इतर नातेवाईक़ांचा नंबर लक्षात नाही. त्यांच्याशी नेहमी काम पडत असले तरी मोबाईलमधून नंबर काढल्यानंतरच फोन लावला जातो, त्यामुळे नंबर लक्षात राहत नाही.
- एक गृहिणी
.......
दररोज पतीदेवाला आवर्जून फोन लावणाऱ्या महिला दिवसात अनेकवेळेस फोन लावतात, मात्र त्यांना काही महिला वगळल्यास अनेकांना आपल्या पतीचा नंबर तोंडपाठ नाही. कारण कोडवर्डमध्ये पतीदेवाचा नंबर त्यांनी सेव्ह केला आहे.
- एक गृहिणी
............................
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
- प्रत्येक पालकांने आपला मुलगा कुठे हरविला तर त्याला घरी परत येता यावे म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला आहे. त्यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यामुळे तो माेबाईल न बघता नंबर सांगतो.
- पीयूृष
............
मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहे. मोबाईल न बघता सुध्दा मला नंबर सांगता येतो. मला कधीही कुणी नंबर विचारला तरी मी सहजपणे सांगतो.
-इशान
............