जलाशयांच्या स्वच्छतेसाठी ‘निर्माल्य संकलन’
By admin | Published: September 18, 2016 12:35 AM2016-09-18T00:35:38+5:302016-09-18T00:35:38+5:30
निर्माल्य टाकल्यामुळे जलाशयांत होत असलेली अस्वच्छता व पाण्याची अशुद्धी टाळण्यासाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य...
१० वर्षांपासून सुरू आहे अभियान : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
गोंदिया : निर्माल्य टाकल्यामुळे जलाशयांत होत असलेली अस्वच्छता व पाण्याची अशुद्धी टाळण्यासाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य संकलन अभियान यंदाही यशस्वीरित्या घेण्यात आले. यंदा जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
येथील मॉ नर्मदा सेवा संस्था, मॉ नर्मदा भजन मंडळ, लोहाणा समाज महा परिषद व सामाजीक वनीकरण विभागाच्या संयुक्तवतीने यंदा निर्माल्य संकलन अभियान शहरात राबविण्यात आले. मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या या अभियानाचा यंदाचा शुभारंभ सिव्हील लाईन्स येथील अपना गणेश उत्सव मंडळातून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक दिलीप भूजबळ, सेवानिवृत्त वन परिक्षेत्राधिकारी अश्वीन ठक्कर, सामाजीक वनिकरण विभागाचे युवराज कंूभलवार, बजरंग दल प्रांत संयोजक देवेश मिश्रा, अपना गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी योगी खंडेलवाल, सुनिल तिवारी, अमित अवस्थी व अन्य उपस्थित होते.
या निर्माल्य संकलन अभियानांतर्गत तीन निर्माल्य रथ बनविण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील प्रमुख गणपती उत्सव मंडळांकडे जावून त्यांच्याकडील निर्माल्य संकलीत केले जात आहे. शिवाय दुपारनंतर सुर्याटोला बांधतलाव, पिंडकेपार नाला, टेमनीतील पांगोली नदी घाटवर हे रथ उभे केले जाते. शहरवासीयांकडून या कार्याची प्रशंसा केली जात आहे हे विशेष. यासाठी नर्मदा सेवा संस्थेचे पदाधिकारी राहूल हारोडे, संस्थापक माधव गारसे, अमित यादव, अजय यादव, कपिल वेगड, जितेंद्र वनवे, गणेश शेंडे सहकार्य करीत आहेत.