भांडी व्यवसायातून ‘निशा’ला मिळाली आर्थिक उन्नतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:17 AM2017-12-04T00:17:59+5:302017-12-04T00:20:20+5:30

अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून दिला. त्यातून त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधत परिस्थतीत बदल घडवून आणला.

 'Nisha' gets the direction of economic growth through the utensil business | भांडी व्यवसायातून ‘निशा’ला मिळाली आर्थिक उन्नतीची दिशा

भांडी व्यवसायातून ‘निशा’ला मिळाली आर्थिक उन्नतीची दिशा

Next
ठळक मुद्देअनामिका महिला बचतगट : तिन्ही व्यवसायांसाठी माविमचे मार्गदर्शन व सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून दिला. त्यातून त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधत परिस्थतीत बदल घडवून आणला. ही बाब महिलांना प्रेरणा देणारी ठरली आहे.
बिडी बांधणे व कबाडीचे सामान घेणे या छोटाशा व्यवसायातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा निशा व त्यांच्या कुटुंबाचा नित्यक्रम होता. कुटुंबातील सहा सदस्य मजुरी करीत होते.
कुटुंब मोठे असल्यामुळे अल्पशा मिळकतीतून भागत नव्हते. निशा आधी गटात नव्हत्या. मासिक १०० रूपये कसे भरणार या भीतीपोटी त्या महिला बचत गटात येण्यास घाबरत होत्या. परंतु माविम प्रकल्पामुळे गटाबद्दल चांगले मार्गदर्शन मिळाले. तसेच सीआरपी व सहयोगीनींच्या समजावण्यावरून त्यांनी गटात प्रवेश केला.
त्यांनी सर्वप्रथम गटाच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँकेमधून ४० हजार रूपये व फिरता निधी म्हणून १० हजार रूपये असे एकूण ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून त्यांनी पतीला भांडी (बर्तन) विकण्याचा व्यवसाय लावून दिला. त्यांचे पती दुचाकी वाहनाने जावून भांडी विकत आहेत. त्यात त्यांना चांगला लाभ मिळाला. जवळपास भांडी विक्रीचे दुकान नसल्यामुळे नागरिकांना आमगावला जावून भांडी खरेदी करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी सदर व्यवसायाला प्राधान्य देवून तो सुरू केला.
त्यानंतर त्यांनी आणखी दुसरा व्यवसाय करण्याचे ठरविले. पुन्हा २५ हजार रूपयांचे कर्ज घेवून दाळ, तीळ, चना, वाटाणे आदी वस्तूंची गावात जावून विक्री करण्यास सुरूवात केली. त्यातही त्यांना चांगला फायदा मिळत आहे. यामुळे पुन्हा त्यांनी आयसीआयसीआय बँकेमधून ८७ हजार ५०० रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून त्यांनी भांडी दुकानात वाढ केली. लग्नसराईच्या हंगामात या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळाला. तसेच ते कर्जाची परतफेड दर महिन्याला ठरलेल्या तारखेला नियमित करीत आहेत.
कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय करा
निशा रामटेके यांची गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व गटात आल्यानंतरच्या परिस्थितीत खूप बदल झालेला आहे. आता त्यांच्या हाती तीन व्यवसाय आहेत. गटात असल्यामुळेच त्यांची आजची परिस्थिती बदलली आहे. आता त्या आपले कुटुंब चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. त्यांना गटाच्या माध्यमातून कमी व्याजाची रक्कम मिळाली आहे. तर व्यवसाय करण्यासाठीही मदत होत आहे. स्वत:च्या व्यवसायामुळे कर्जाची वेळेवर परतफेडही करीत आहेत. त्यामुळे बचत गट तयार करा व कर्ज घेवून छोटे-मोठे व्यवसाय करा, असा संदेश त्यांनी इतर महिलांना दिला आहे.
बचत गटाच्या माध्यमातून मिळाली चालना
झालिया गाव सालेकसापासून १० किमी. अंतरावर आहे. गावात माविमचे १७ बचत गट आहेत. त्यात अनामिका स्वयंसहायता महिला बचत गट महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून (एमएसआरएलएम) तयार झाला आहे. या गटाची स्थापना २६ जून २०१४ रोजी झाली असून सदस्य संख्या १२ आहे. यात यात एससी ५, ओबीसी ४ व एनटीच्या ३ महिलांचा समावेश आहे. गटाची मासिक बचत प्रत्येकी १०० रूपये आहे. या बचत गटाच्या माध्यमातूनच आपल्याला चालना व प्रेरणा मिळाल्याचे निशा रामटेके यांनी सांगितले.

Web Title:  'Nisha' gets the direction of economic growth through the utensil business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.