नितीनचा अपघात की हत्या?
By admin | Published: April 23, 2016 01:46 AM2016-04-23T01:46:38+5:302016-04-23T01:46:38+5:30
आपल्या सवंगड्यासोबत खेळायला गेलेला तीन वर्षीय नितीन तब्बल २९ तासांनी घरा जवळील विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळला.
शंकेला पेव फुटले : मृत शरीरावर आढळल्या जखमा
बोंडगावदेवी : आपल्या सवंगड्यासोबत खेळायला गेलेला तीन वर्षीय नितीन तब्बल २९ तासांनी घरा जवळील विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळला. घटनेला पंधरवाडा उलटला असला निश्चित माहितीअभावी विविध चर्चेचे पेव फुटले आहे.
याबाबत गावातील चर्चेवरून मिळालेल्या माहितीनुसार येथील विलास पुस्तोडे यांचा एकुलता एक ३ वर्षाचा मुलगा नितीन १ एप्रिल रोजी १०.३० वाजता आईला सांगून घराजवळच्या मंदिर परिसरात आपल्या संवगड्या सोबत खेळायला गेला. त्याची आई चंद्रकला आंघोळ केल्यानंतर जेवणासाठी आपल्या बाळाला बोलावण्यासाठी १०.४५ वाजता गेली. मंदिर परिसरात मुलगा दिसत नाही म्हणून समोरच्या चौकात गेली. आपला पोटचा गोळा अचानक कुठे गेला. या विवंचनेत पडून त्या मातेने अख्या गाव पिंजून काढला. दिवस उलटला तरी नितीनचा पत्ता नाही. नातलगाच्या मदतीने अखेर त्या मातेने अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन येथे केली. पोलिसांनी घराशेजारील विहीर व गावाजवळील तलाव पिंजून काढला. परंतु नितीनचा पत्ता लागला नाही. विहीरीमध्ये अनेकदा गळ टाकून पाहण्यात आला. गळाला काहीच लागले नाही.
२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजता दरम्यान त्याच विहीरीमध्ये नितीनचा प्रेत आढळून आला. प्रेत बाहेर येताच अनेकांनी विविध शंका केल्या. डाव्याबाजूला कपाळावर मोठी जखम व नाकावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत असल्याने २९ तास पाण्यातील प्रेत असताना जखमा मिटलेल्या अवस्थेत दिसून येत नव्हत्या. त्या विहीरीमध्ये १ तारखेला कित्येकदा गळ टाकून पाहण्यात आले. परंतु हाती काहीच लागले नाही. २ एप्रिल ४ वाजे ज्या विहीरीमधून नितीनचे प्रेत निघाले. २९ तासापासून बेपत्ता झाल्याचे नितीनचे प्रेत विहीरी बाहेर काढल्यानंतर ताजेतवाने होते. नितीनच्या मृतदेहावर पाण्याचा प्रभाव, दिसून येत नव्हता असेही दर्शकांकडून सांगण्यात येत होते.
घराजवळच विहीर असताना नितीन एकटा विहीरीकडे कधी गेला नाही असे घरच्या लोकांच्या चर्चेवरून समजते. विहीरीमध्ये पडल्यानंतर नितीनच्या कपाळाला खोल अशी मोठी जखम कशी पडली. या घटनेला २० दिवस होऊन सुध्दा अजून पावेतो कोणता निष्कर्ष निघाला नाही. गावात सुरू असलेल्या चर्चेवरून नितीनला ठार मारून नंतर काही वेळाने विहीरीमध्ये टाकण्यात तर आले नाही ना? अशी शंका येते.
मंदिरा शेजारील एका अल्पवयीन मुलींचे घटनेच्या दिवशी १२.३० वाजताच्या दरम्यान नितीनचा रडण्याचा आवाज ऐकल्याचे बोलल्या जाते. याचा खोलात जाऊन तपास केला तर काही धागेदोरे निश्चित गवसतील अशी जनमानसात चर्चा आहे.(वार्ताहर)