एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:59 AM2018-04-19T00:59:20+5:302018-04-19T00:59:20+5:30

मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.

No cache pane outside the ATM center | एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

Next
ठळक मुद्देग्राहक अडचणीत: चार दिवसांपासून समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.
शहर आणि जिल्ह्यात विविध बँकाचे १५० जवळपास एटीएम केंद आहे. बँकांनी सर्वच ग्राहकांना एटीएम वितरीत केले आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्वत:जवळ रोख न बाळगता एटीएम कार्ड ठेवतात. त्यामुळे बाहेरगावी कॅश घेऊन जाण्याची अडचण आणि जोखीम कमी झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात देखील एटीएमची सुविधा असल्याने बहुतेक सर्वजण स्वत: जवळ रोख बाळगत नाही. एकंदरीत सर्वांनाच एटीएमची सवय लागली आहे. मात्र मागील तीन चार दिवसांपासून एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक लागल्याने ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहे.
ही समस्या केवळ एका एटीएममध्ये असेल म्हणून ग्राहक दोन तीन एटीएम केंद्रात जावून चाचपणी करीत आहेत. मात्र तिथे देखील हीच समस्या असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
एटीएममधून पैसे निघत नसल्याने दररोजच्या छोट्या छोटया गरजा भागविण्यासाठी बँकेतून जावून रांगेत लागून पैसे काढण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. मात्र सर्वाधिक एटीएमची अडचण प्रवाश्यांना व बाहेरगावावरुन येणाºया ग्राहकांना बसत आहे.

दोनशे, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांची टंचाई
सर्वच बँकाना रिर्झव्ह बॅकेकडून पत पुरवठा केला जातो. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून बँकाना रिर्झव्ह बँकेकडून पत पुरवठा झाला नाही. तर दोनशे, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा सध्या बंद झाला असल्याने बँकासमोर देखील अडचण निर्माण झाली आहे. पत पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये कॅश टाकणार कशी असे बँकेचे अधिकाºयांचे म्हणने आहे.
कॅशलेस व्यवहारासाठी टंचाई
केंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. यासाठी भीम अ‍ॅप, पेटीएम सारखे प्रयोग राबविले. कॅशलेस व्यवहार भर देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कॅशलेस व्यवहाराला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यामुळेच पत पुरवठा ठप्प करुन ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बाध्य केले जात आहे. सध्या एटीएम केंद्रामध्ये निर्माण झालेली टंचाई हा त्याचाच एक भाग असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

रिझर्व्ह बँकेकडून बँकाना होणार पतपुरवठा मागील चार पाच दिवसांपासून ठप्प झाला आहे.त्यामुळे एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून कॅश मिळताच सर्व एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध करुन दिली जाईल.
- दिलीप सिलारे, मुख्य व्यवस्थापक बँक आॅफ इंडिया गोंदिया,

काही एटीएममध्ये केवळ दोन हजाराची नोट
शहरातील काही बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध आहे. मात्र या एटीएममध्ये केवळ दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे.त्यामुळे दोनशे, पाचशे रुपये काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. तर ज्या ग्राहकांच्या खात्यात केवळ हजार रुपये शिल्लक आहे त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटमुळे दोनशे तिनशे रुपये काढण्यास अडचण जात आहे.

Web Title: No cache pane outside the ATM center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम