एकही बालक बाल हक्क संरक्षणापासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:19 PM2019-07-14T21:19:47+5:302019-07-14T21:21:03+5:30
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि.१९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्र ारीबाबत जनसुनावणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि.१९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्र ारीबाबत जनसुनावणी होणार आहे. यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. यासंदर्भात आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे. जेणेकरु न जिल्ह्यातील एकही बालक बाल हक्क संरक्षणापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.१२) आयोजित जिल्ह्यातील विविध विभागांतील बाल हक्क संरक्षणाच्या जनसुनावणीबाबत आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी व निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या हक्काबाबत तक्र ारी जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्र-ठिकाणावरुन प्राप्त होण्याकरीता सर्व विभागांनी आपल्या नोटीस बोर्डवर, आपल्या विभागाच्या शाखा- उपशाखांमार्फत सदर जनसुनावणी संदर्भात माहिती प्रदर्शीत करु न जनजागृती करण्यात यावी असे सांगीतले. तसेच ज्या ठिकाणी बाल हक्क संरक्षण जनसुनावणीबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी दवंडीद्वारे प्रचार करण्यात यावा. तसेच गावखेड्यांत विविध सार्वजनिक क्षेत्र, कार्यालये, शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा, अंगणवाडी इत्यादी ठिकाणी जनसुनावणीबाबत माहिती प्रदर्शीत करु न ० ते १८ वर्षे वयोगटातील बाल हक्क संरक्षण संदर्भात तक्र ारी प्राप्त करु न घेवून शुक्रवारी (दि.१९) गडचिरोली येथे जनसुनावणीस उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा बाल हक्क तक्र ारींसह उपस्थित राहावे असे सांगितले.
प्रास्ताविकातून महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी बोरीकर यांनी गडचिरोली येथे शुक्रवारी (दि.१९) सकाळी ९ वाजतापासून जनसुनावणी होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या बालकांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्यास या जनसुनावणीचा अवश्य लाभ घ्यावा, असे सांगीतले. सभेला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.