जंतनाशक गोळ््यांपासून एकही बालक वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:07 PM2018-07-22T21:07:21+5:302018-07-22T21:09:56+5:30
बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १० आॅगस्ट राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.बी.खंडाते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी टी.व्ही.पौनीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक अधिकारी व्ही.व्ही.तितीरमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
१० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील तीन लाख ४३ हजार २७१ बालकांना जंतनाशकाच्या गोळ््या देण्यात येणार आहे. त्याकरीता १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे.
ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, पाणी पुरवठा व पंचायत विभाग दक्षतापूर्वक काम करीत आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सभेचे सादरीकरण जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.
असा दिला जाणार डोज
जंताचे राऊंड वर्म, व्हीप वर्म व हुक वर्म असे तीन प्रकार असून त्यांचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जसे- जंतसंसर्गाचा बालकांच्या रक्तक्षय (अनिमिया), अतिसार, मळमळणे, भुक मंदावणे, थकवा व अस्वस्थपणा, कुपोषण, शौचाच्या वेळेस रक्त पडणे, पोटाला सुज येणे इत्यादी परिणाम होतात. वयोगटानुसार १ ते २ वर्ष वयोगटात अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅम) व ३ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅम) विनामूल्य देण्यात येणार आहे.