ना-मान, ना-धन; जगायचं कसं? वृद्ध कलावंत व साहित्यिकांना हवा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:44 PM2024-10-02T15:44:16+5:302024-10-02T15:45:05+5:30

कलावंताना हवा आधार : मानधन वाढ व नियमित मिळणे गरजेचे

No-esteem, no-wealth; How to live? Old artists and writers need support | ना-मान, ना-धन; जगायचं कसं? वृद्ध कलावंत व साहित्यिकांना हवा आधार

No-esteem, no-wealth; How to live? Old artists and writers need support

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
वृद्ध कलावंत व साहित्यिकांना आधार व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नाट्यकलावंतांना महिन्याला मानधन मिळत आहे. मात्र, ज्या कलावंतांनी गेल्या एक-दीड वर्षात प्रस्ताव सादर केले अशांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.


यंत्रणाच उदासीन
नाटक, दंडार, तमाशा तसेच इतर जनजागृतीपर कार्यक्रमात कला दाखवून प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना शासनाच्या योजनेंतर्गत मानधन सुरू करण्याची योजना अंमलात आणण्यात आली. ही योजना सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभा- गामार्फत राबविली जात आहे.


आता पाच हजार रुपये मानधन
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी कलावंतांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. पूर्वी हेच मानधन अडीच हजार रुपये मिळत होते.


कलावंतांना द्या मानधन 
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन, विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. यामध्ये वर्गवारीनुसार कलावंतांना मानधन दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'अ' दर्जा, राज्य पातळीवर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'ब' दर्जा, तर जिल्हास्तरावर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'क' दर्जा देऊन त्यानुसार मानधन अदा केले जाते. यासाठी ५० वर्षापेक्षा वय अधिक असावे.


असे आहेत मानधन लाभाचे निकष
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. यामध्ये वर्गवारीनुसार कलावंतांना मानधन दिले जाते. 


"सन्मान योजनेसाठी मी दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. समितीची बैठक होत नसल्याने अडचण आहे."
- भागरथा भांडारकर, भजनी मंडळ-पदमपूर


"योजनेचा लाभ मला पाच वर्षांपासून मिळत आहे. मात्र, वाढीव मानधन अजूनही मिळाले नाही. या योजनेमुळे मोठा आधार मिळाला."
- परसराम हुकरे, कलावंत-पदमपूर 


"राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी कलावंतांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. पूर्वी हेच मानधन अडीच हजार रुपये मिळत होते. निकषात बसत असलेल्या कलावंतांची निवड करून समितीमार्फत निवड केली जाते." 
- अध्यक्ष-वृद्ध जीवनलाल लंजे, कलावंत समिती


 

Web Title: No-esteem, no-wealth; How to live? Old artists and writers need support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.