एसटीची ऑनलाईन बुकिंग सुविधा माहितीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:34+5:302021-08-28T04:32:34+5:30

कपिल केकत गोंदिया : प्रवासासाठी नागरिकांचा रेल्वे तसेच एसटीवर जास्त भरवसा असून यामुळेच राज्य रस्ते परिवहन महामंडळ रेल्वेच्या धर्तीवर ...

No information about ST's online booking facility! | एसटीची ऑनलाईन बुकिंग सुविधा माहितीच नाही!

एसटीची ऑनलाईन बुकिंग सुविधा माहितीच नाही!

Next

कपिल केकत

गोंदिया : प्रवासासाठी नागरिकांचा रेल्वे तसेच एसटीवर जास्त भरवसा असून यामुळेच राज्य रस्ते परिवहन महामंडळ रेल्वेच्या धर्तीवर नवनवे प्रयोग करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करवून देत आहेत. त्यानुसार, महामंडळाने रेल्वेनुसारच ऑनलाईन बुकिंगची सोय प्रवाशांना उपलब्ध करवून दिली आहे. मात्र शोकांतिका अशी की, आजही कित्येकांना याबाबत माहिती नसल्याने एसटीतील प्रवाशांच्या तुलनेत ऑनलाईन बुकिंगचे प्रमाण तेवढे दिसून येत नाही. प्रवाशांचा प्रवास सुखरूप व सोयीचा व्हावा यासाठी महामंडळाच्या नवनव्या प्रयोगांचा लाभ घेणे तेवढेच गरजेचे आहे.

---------------------------------

१) दहा वर्षांत झालेले ऑनलाईन बुकिंग!

वर्ष ऑनलाईन बुकिंग

२०११

२०१२

२०१३

२०१४

२०१५

२०१६

२०१७

२०१८

२०१९

२०२०

२०२१ (ॲगस्टपर्यंत) -

----------------------------

असे करावे ऑनलाईन बुकिंग

- ऑनलाईन बुकिंगसाठी प्ले-स्टोर मधून एमएसआरटीसीच्या ॲपमध्ये जाऊन गाडीचा प्रकार निवडून प्रवासाचा मार्ग निवडावा.

- त्यानंतर त्यामध्ये असलेले पेमेंट ऑप्शन निवडून तसे पेमेंट केल्यास लगेच स्क्रीनवर पावती येते व ही पावती प्रवासात ग्राह्य असते.

- विशेष म्हणजे, आता यासह रेडबस व इंद्रधनुषसारखे अन्य ॲप उपलब्ध असून त्यावरूनही ऑनलाईन बुकिंग करता येते.

---------------------------------

आम्हाला ठाऊकच नाही!

एसटीच्या प्रवासासाठी मोबाईलवरून ऑनलाईन बुकिंग करता येते याबाबत आम्हाला माहिती नव्हती. रेल्वेचे बुकिंग करता येते हे मात्र ठाऊक होते. आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने एसटीच्या पुढील प्रवासात त्याचा लाभ घेऊ.

-गीता पाऊलझगडे

-----------------------------

रेल्वेत जागेसाठी मोबाईलने ऑनलाईन बुकिंग केले जात असल्याचे ऐकले असून बघितलेही आहे. मात्र एसटीमध्ये मोबाईलने ऑनलाईन बुकिंगबाबत माहिती नव्हती. आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने धक्के खात प्रवास करण्यापेक्षा बुकिंग करू.

- योगेश खोटेले

-----------------------------

प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करवून दिल्या जात आहेत. ऑनलाईन बुकिंगची सुविधाही मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आपल्याकडे त्याचे प्रमाण अल्प आहे. मात्र काही नागरिकांकडून ऑनलाईन बुकिंग केली जाते.

- संजना पटले

आगारप्रमुख, गोंदिया.

Web Title: No information about ST's online booking facility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.