महापुरूषांच्या विचारांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही
By admin | Published: January 17, 2017 12:56 AM2017-01-17T00:56:39+5:302017-01-17T00:56:39+5:30
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे प्राण बलिदान करणारे महापुरुष व समाजातील नागरिकांसाठी ज्यांनी आपल्या ...
संजय पुराम : ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण
देवरी : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे प्राण बलिदान करणारे महापुरुष व समाजातील नागरिकांसाठी ज्यांनी आपल्या थोर विचारांनी समाजात चांगल्या विचारांची बीज रोपण करुन समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य ज्या महापुरुषांनी केले, त्या महापुरुषांच्या विचारांपेक्षा आम्ही मोठे नाही, असे प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी केले.
तालुक्यातील चिचगड जि.प. क्षेत्रांतर्गणत गरारटोला येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी महासंघाद्वारे आयोजित महात्मा ज्योुयबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ माळी महासंघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोरे होते. अतिथी म्हणून जिल्हा माळी संघाचे अध्यक्ष अनिल डोंगरवार, किशोर देशकर, महिला अध्यक्ष गायत्री इरले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार, से.नि.नायब तहसीलदार देविदास गुरुनुले, माजी सभापती कामेश्वर निकोडे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष यशवंत गुरुनुले, सरपंच चंद्रकला कावळे, शालीकराम गुरुनुले, एकनाथ सोनुले, माजी सरपंच प्रेमचंद गुप्ता, कृषी सहाय्यक हटवार, भाजपचे तालुका महामंत्री विनोद भेंडारकर आदी उपस्थित होते.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अॅड. महाडोरे यांनी शिक्षणक्षेत्रात फुले दामपत्यांनी केलेल्या कार्याची व समाज सुधारणेसाठी केलेल्या कार्याची जाणीव करुन दिली. त्यांचे विचार तरुणांनी आत्मसात करुन येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी उज्वल प्रगत समाज निर्माण करावा, असे प्रतिपादन केले. उपस्थित मान्यवरांनी या समाजप्रबोधन कार्यक्रमात समाजबांधवांना मार्गदर्शन केले. भाजयुमोचे कुलदीप लांजेवार यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचे फक्त अनावरण करुनच चालणार नाही तर त्यांच्या प्रतिमेचे दर्शन करुन त्यांचे विचार अंगिकृत करुन महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्याचे कार्य आजच्या तरुण पिढीने केले पाहिजे, असे सांगितले.
प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष भाष्कर निकोडे यांनी मांडले. संचालन नागेश्वर निकोडे यांनी केले. आभार उत्तम निकोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले माळी महासंघ, सावित्रीबाई फुले महिला आघाडी समिती, नवगाव माळी समाज संघटना घोनाडीच्या सर्व सभासद व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी )