एसटीतील राखीव जागांचा वापर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:55+5:302021-06-16T04:38:55+5:30
शहरातील पथदिवे दिवसा सुरूच तिरोडा : येथील पथदिवे दिवसासुद्धा सुरू राहतात. याकडे स्थानिक न.प.चे दुर्लक्ष असून सर्वसामान्य जनतेवर ...
शहरातील पथदिवे दिवसा सुरूच
तिरोडा : येथील पथदिवे दिवसासुद्धा सुरू राहतात. याकडे स्थानिक न.प.चे दुर्लक्ष असून सर्वसामान्य जनतेवर त्या विद्युत बिलाचा अधिभार सहन करावा लागतो. पथदिवे दिवसादेखील सुरू असतात. याकडे न. प. कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. पथदिव्यांमुळे सर्वसामान्यांवर अधिभार जास्त सोसावा लागत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. काहींना लाभ मिळाला. मात्र, काही अद्यापही वंचित आहेत.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत वाहतूक नियंत्रण शाखेनेही कारवाई करण्याची गरज आहे.
बँकांत दलालांकरवी होतेय फसवणूक
सडक-अर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. कामे करवून घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक फसत आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आमगाव : स्थानिक परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ही कुत्री एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ते जखमी करत असतात. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कचरा पेट्यांची व्यवस्था करावी
तिरोडा : येथील सहकारनगरात नगरपरिषदेच्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
राइस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यांत धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यांत कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. या उघड्या डीपींमधून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
नवेगावबांध : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या, तेथील नाल्याही बुजवून टाकल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहते.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही.