ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:58+5:302021-08-27T04:31:58+5:30
परसवाडा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गोंदियाच्या अंतर्गत तिरोडा पंचायत समिती कार्यालयासमोर तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे असहकार आंदोलन ...
परसवाडा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गोंदियाच्या अंतर्गत तिरोडा पंचायत समिती कार्यालयासमोर तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे असहकार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाल्याने ग्रामपंचायतीची कामे खोळंबली आहेत.
कोरोना काळात जीवाची कुटुंबाची पर्वा न करता ग्रामपंचायत कार्यालय, गावातील सर्व्हे, जनजागृती, स्वच्छता, लसीकरण मोहीम, पंतप्रधान आवास, रोजगार हमी, पी.एम.किसान, कर्जमुक्ती, सर्व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. यात काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, प्राणाला मुकले. परिणामी त्याचे कुटुंब उघड्यावर आले. काही मृत्यूशी झुंज देत आहे. वर्षभरात आस्थापना जिल्हा प्रशासन पूर्णत: उदासीन असून पदोन्नती, कालबद्ध स्थान प्रस्ताव, वैयक्तिक देयके, सेवा पुस्तके, मृत्यू ग्रामसेवकांचे देयक कार्यवाही न करने प्रलंबित ठेवून जिल्हा प्रशासन हिटलरशाही कार्यप्रणाली चालवित आहे. कालबद्ध पदोन्नती करणे, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांचे प्रस्ताव शासनाला पाठविणे, पेशन निकाली काढून कुटुंबाना देणे, आदर्श पुरस्कार ग्रामसेवक प्रकरण, सारिका लांजेवार कंत्राटी ग्रामसेवक यांना त्वरित नियमित करणे, एनपीएस ग्रामसेवक यांना कार्ड मिळणे, व्हीपीएस २०२१ सातवा वेतन आयोग थकबाकी राहिला. दुसरा हप्ता जीपीएफमध्ये जमा करणे, सातवा वेतन आयोग नवीन पेंशन धारकांना रोखीने देणे, कोरोना असामान्य परिस्थती लक्षात घेता केवळ विनंती बदली करण्यात यावे, प्रशासकीय बदली करु नये या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ग्रामपंचायतला कुलूप लावून चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवतील. असा इशारा संघटनेचे कार्तिक चव्हाण, दयानंद फटींग, अध्यक्ष विभागीय सचिव कमलेश बिसेन, सचिन कुथे, कविता बागळे, एल.आर. ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, रामेश्वर जमईवार, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, परमेश्वर नेवारे, योगेश रुद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, काकड, राजू जमईवार यांनी दिला आहे.