ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:54 PM2019-08-10T23:54:31+5:302019-08-10T23:55:01+5:30

ग्रामसेवक हा जनता व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतो. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासून वेतन तृटी दूर करण्यात आली नाही.ग्रामसेवकांच्या अनेक मागण्यां शासन स्तरावर प्रलबिंत आहे.

Non-cooperation movement of village workers | ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरपूरबांध : ग्रामसेवक हा जनता व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतो. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासून वेतन तृटी दूर करण्यात आली नाही.ग्रामसेवकांच्या अनेक मागण्यां शासन स्तरावर प्रलबिंत आहे.त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये रोष व्याप्त आहे. यामुळे राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी ९ आॅगस्टपासून शासनाविरोधात असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात देवरी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.
ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव विकासाच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन ही राज्यस्तरावर २२ हजार ग्रामसेवक संवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविणे शासन आणि जनता यांच्यात समन्वय ठेऊन विकासाच्या वेग वाढविणे याकडे लक्ष देते.त्यांच्या हक्क व जबाबदारीची जाणीव आणि सेवा विषयक प्रलंबित प्रश्नावर न्याय मार्गाने शासनाकडे पत्रव्यवहार, निवेदन देणे, पाठपुरावा सोडवणूक करीत असते.मात्र ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्या अध्यापही प्रलंबित आहे. डिसेंबर २०१६ ला दिलेल्या लेखी आश्वासनानुसार अध्यापही अनेक शासनाने मार्गी लावल्या नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यासाठी ग्रामसेवकांनी ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. देवरी तालुकाध्यक्ष तारेश कुबडे व सचिव रवी अंबादे यांच्या मार्गदर्शनात सर्व ग्रामसेवक असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामीण जनतेची कामे प्रभावित झाली आहे.

Web Title: Non-cooperation movement of village workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.