सिकलसेल तपासणी किटच नाही!

By Admin | Published: August 21, 2016 12:05 AM2016-08-21T00:05:08+5:302016-08-21T00:05:08+5:30

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे.

Not a clinical inspection kit! | सिकलसेल तपासणी किटच नाही!

सिकलसेल तपासणी किटच नाही!

googlenewsNext

पिवळ्या गोळ्यांवर बंदी : पाण्याचे शुध्दीकरण करणारे मेडिक्लोर दिलेच नाही
गोंदिया : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. मात्र विदर्भात सर्वात जास्त सिकलसेल रूग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात असताना या जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली किट उपलब्ध नाही. त्यामुळे सिकलसेलचे रूग्ण ओळखण्याची प्रक्रिया कशी करावी असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांची तपासणी करण्यासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून सोलोबिलिटी बफर सोल्युशन आणण्याची तयारी आहे. परंतु या सोल्युशनची गुणवत्ता मुदत फक्त दोन दिवसांची असते. त्यामुळे ते बफर सोल्युशन आणणे परवडण्यासारखे नाही. स्थानिक स्तरावर ही किट कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या बाबतीत आरोग्य विभागाची उदासीनता दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात अशुद्ध पाण्यामुळे सर्वात जास्त हागवणीच्या तक्रारी सुरू होतात. परंतु त्यावर रामबाण उपाय समजल्या जाणाऱ्या सर्वपरिचित पिवळ्या गोळ्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातल्यामुळे मागील दोन वर्षापासून त्या गोळ्या देण्यात येत नाही. परंतु त्याऐवजी पर्यायी व्यवस्था अ‍ॅन्टीबॉयटीक मेट्राजिल या गोळ्या देण्यात येतात. त्याचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्यात पाण्यामुळे सर्वात जास्त आजार जडत असतात. पाणी शुध्द करून प्यावे असे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येते. परंतु यावर्षी राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत मेडिक्लोर वाटप करण्यात आले नाही. त्यासाठी पावसाचे पाणी शुध्द न करताच ग्रामीण भागात ते पाणी पिले जात आहे. या मेडीक्लोरची ६ महिन्यांची मुदत असते. ते पुरविण्याचे आदेश दिल्यावर पोहोचण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत असल्याने पाच महिन्यात वाटप करून ते वापरले जाणे आवश्यक असते. परंतु यावर्षी पावसाळा संपत येत असला तरी मेडीक्लोर जिल्ह्यात आल्या नाही.
किशोरवयीन विद्यार्थ्यांना आयर्नच्या गोळ्या देण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १ कोटी २९ लाख गोळ्या वाटप केल्या आहेत. सिकलसेल तपासणी इलेक्ट्रोफोरेसिस मशीनने करता येते. परंतु ही सेवा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात कार्यरत नाही. (तालुका प्रतिनिधी)

- ३५८ प्रकारच्या औषधींची मागणी
सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ३५८ प्र्रकारच्या औषधी मागविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ३५८ प्रकारच्या औषधी शासनाकडे आॅनलाईन पध्दतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मागितल्या आहेत. मात्र त्या अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत.
सोशल आॅडिट करा
जिल्ह्यात ११ लाख अ‍ॅन्टीबॉयोटीकच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. एका उपकेंद्रात एक आरोग्य सेविका, एक सहाय्यक आरोग्य सेविका तर एक आरोग्य सेवक असतो. त्या तिघांपैकी प्रत्येकाने दररोज १० गोळ्या वाटप केल्या तर महिन्याकाठी ९०० गोळ्या एका उपकेंद्रामार्फत वाटल्या जाऊ शकतात. परंतु काही उपकेंद्रातील कर्मचारी काम करीत नसल्यामुळे त्यांच्या कामाचे सोशल आॅडीट करावे अशी कुजबूज आरोग्य विभागात सुरू आहे.

Web Title: Not a clinical inspection kit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.