निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आलो ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:26 AM2021-03-15T04:26:47+5:302021-03-15T04:26:47+5:30
देवरी : मी येथे कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल ...
देवरी : मी येथे कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
शहरातील सनशाईन पब्लिक स्कूल येथे आयोजित नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी १३ ग्रामपंचायतींमधील नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच व सदस्यांनी पक्षात प्रवेश केला. तसेच तालुक्यात वीज विभागातर्फे घरगुती वीज जोडणी खंडित करण्याचे प्रकरण जास्त असल्याने सभेत लोकांनी या विषयाला गांभीर्याने घेत वीज विभागाने काही दिवस बिल भरण्याकरिता सवलत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असल्यामुळे कोरोनाकाळात हरविलेले रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर तालुक्यातील लोकांनी जोर धरला होता.
या कार्यक्रमाला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विजय शिवनकर, रमेश ताराम, किशोर तरोने, केशोराव भूते, गोपाल तिवारी, सी. के.बिसेन, भैय्यालाल चांदेवार, खुशाल बोपचे, दिलीप दुरुपकर, मुकेश खरोले, मनोहर राऊत, कैलाश मरस्कोल्हे, हिमांशू ताराम, सुजित अग्रवाल, ईदंल अरकरा, नेमिचंद आबिलंकर, सत्यवान देशमुख, मुन्ना हन्सारी, रंजन मेश्राम, बबलू पठाण, पार्बता चांदेवार, सुमन बिसेन, अर्चना ताराम, मंजुषा वासनिक, शर्मिला टेंभुर्णीकर, कोमल खरोले, आरती जांगळे, माधुरी शहारे, उषा तिवारी, रूपाली गोडसेलवार, प्रमीला गावड, पुष्पा मस्के, सविता बडवाईक, प्रीती गजिये, गुणवंता कवास व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. योगेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. विलास चाकाटे यांनी आभार मानले.