ही चुका शोधण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 05:00 AM2021-05-16T05:00:00+5:302021-05-16T05:00:16+5:30

खा. प्रफुल्ल पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. खा. पटेल म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुद्धा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील.

This is not a time to find fault, but a time to deal with adversity | ही चुका शोधण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची वेळ

ही चुका शोधण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची वेळ

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : औषधसाठा, ऑक्सिजनची समस्या नाही, ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढविणार

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया  : कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णावाढ झाली; मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षम केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. या संकटाचा सामना करीत असताना यंत्रणेच्या काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतील, मात्र ही चुका काढण्याची किंवा टीका करण्याची वेळ नाही तर आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढण्याची वेळ असून, कोविडच्या लढ्यात यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 
खा. प्रफुल्ल पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. खा. पटेल म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुद्धा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे, तर गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग प्लांट उभारण्यात येणार आहे. तर स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून, मी वेळाेवेळी प्रशासनाच्या संपर्कात असून, रोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, नगरसेवक विनित शहारे उपस्थित होते. 
 

मेडिकलमध्ये लवकरच नवीन सीटी स्कॅन मशीन
- कोरोनामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील एकाच मशिनवरील ताण वाढला असून, येत्या १५ दिवसांत आणखी नवीन सीटी स्कॅन मशीन लावण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधीसुद्धा उपलब्ध आहे. मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार असून, २०२३ पर्यंत मेडिकलची सुसज्य इमारत तयार होईल, असा विश्वास खा. पटेल यांनी यावेळी व्यक्त केला. 
अदानी प्रकल्पाकडून ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द
- अदानी विद्युत प्रकल्पाने कोरोना संकटात जिल्ह्याला बरीच मदत केली असून, १३ केएलच्या ऑक्सिजन टँकनंतर आता ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुद्धा उपलब्ध करून दिले. या ऑक्सिजन सिलिंडरचे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच आणखी ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. 

रब्बीतील धान खरेदी व नोंदणीला मुदतवाढ 
- खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली नाही, तर यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत गेली आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थती लक्षात घेता रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक दर्शविली आहे. तसेच रब्बीतील धान खरेदी सुद्धाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच धानाच्या भरडाईचासुद्धा तिढा सुटला असून, उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचली केली जाणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. 
धानाचा बोनस लवकरच 
- कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. सकारच्या तिजोरीतसुद्धा ठणठणाट आहे. मात्र, संकट काळात राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बोनसची रक्कम येत्या १५ दिवसांत दिली जाईल. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीसुद्धा चर्चा केली असून, त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखविली असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
 

 

Web Title: This is not a time to find fault, but a time to deal with adversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.