आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:21+5:302021-08-18T04:35:21+5:30
गोंदिया : मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने याचा विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाणे-येणे बऱ्याच ...
गोंदिया : मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने याचा विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाणे-येणे बऱ्याच प्रमाणात कमी झाले. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्वच व्यवहार जवळपास रुळावर आले आहे. मात्र टॅक्सी व्यवसाय अद्यापही रूळावर आला नाही. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याचा परिणामी टॅक्सी सर्व्हिसच्या संचालकांनी प्रति किलोमीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. तर नागरिकांचे बाहेरगावी येणे जाणे देखील सुरू झाले आहे, पण टॅक्सीच्या दरवाढीमुळे ग्राहकांची टॅक्सीची मागणी थोडी कमी झाली आहे. दीड वर्षात जळपास ७ ते ८ महिने वाहतुकीवर निर्बंधच होते त्यामुळे सुद्धा टॅक्सी व्यवसाय डबघाईस आला होता. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, पर्यटनस्थळेदेखील गर्दीने फुलू लागली आहेत. पण टॅक्सीच्या दरवाढीमुळे अनेक जण टॅक्सीची मागणी करीत नाही. टॅक्सीची देखभाल दुरुस्ती, चालकाचे वेतन, टक्सेस याशिवाय इतर खर्च येत असल्याने टॅक्सीच्या दरात वाढ करावे लागत असल्याचे टॅक्सी संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
............
टॅक्सीचे दर प्रति किलोमीटर
डिझायर-१२ रुपये
इनोव्हा : १३ रुपये
क्रेस्टा : १४ रुपये
१७ सिटर ट्रॅव्हलर : २४ रुपये
....................
पेट्रोल-डिझेल दर (प्रति लिटर) रुपयात
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ - ७४.६९ ६५.४१
जानेवारी २०२० - ८०.४० ७२.००
जानेवारी २०२१- ९०.८० ८९.०२
ऑगस्ट २०२१ - १०७.०० ९५.००
..............................................
गाडीचा हप्ता भरणार कसा
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे टप्प झाले आहे. याचा फटका आमच्या टॅक्सी व्यवसायाला सुध्दा बसला आहे. त्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने ग्राहकांनी सुद्धा आमच्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मला टॅक्सीचा हप्ता भरणे सुद्धा कठीण झाले आहे.
-विनोद माकोडे, टॅक्सीचालक
...............
टॅक्सी व्यवसायाची गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे वाहन चालकाचे वेतन, हप्ते आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात टॅक्सीचे भाडे वाढविल्याने ग्राहक मिळणे कठीण झाले आहे.
- दिवाकर नारायण, टॅक्सीमालक
.............