आता मंजूर ले-आऊट होईल दस्त नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:45+5:302021-07-16T04:20:45+5:30
बिरसी फाटा : गैर कृषक जमिनीवर प्लॉट पाडून यात रस्ते, सार्वजनिक हिताच्या जागेचा गैरकायदेशीर विक्री शासकीय नियमांचे उल्लंघन ...
बिरसी फाटा : गैर कृषक जमिनीवर प्लॉट पाडून यात रस्ते, सार्वजनिक हिताच्या जागेचा गैरकायदेशीर विक्री शासकीय नियमांचे उल्लंघन करून होत असलेल्या नोंदणीला आता चाप बसणार आहे. शासकीय नियमाप्रमाणे प्लॅनरद्वारे मंजूर अधिकृत नकाशानुसारच दस्त नोंदणी करण्याचे आदेश दिल्याने कायदेशीररित्या दस्त नोंदणी करून सार्वजनिक हिताच्या होणाऱ्या नुकसानीस आळा बसणार आहे.
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात जमिनीचे दर वाढल्याने ले-आऊटधारकांकडून अकृषक जमिनीवर प्लॉट पाडून या ले-आऊटमधील रस्ते व सार्वजनिक हिताच्या बळकावून गैरकायदेशीररित्या शासनाचा अधिकृत नकाशा दाखवता खासगी व्यक्तीद्वारे तयार केलेल्या नकाशाप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात येत होती. यामुळे ले-आऊटमधील रस्ते अरूंद होऊन सार्वजनिक हिताच्या जागा राहात नसल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन व सार्वजनिक हिताचे नुकसान होत आहे. याबाबत तिरोडा येथील काही नागरिक राज्यातील अनेक नागरिकांतर्फे उपमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. नकाशानुसारच नोंदणी करा. राज्याचे उपमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी १२ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार आता दुय्यम निबंधकांनी दस्त नोंदणी करताना शासनाच्या नियमाप्रमाणे टाऊन प्लॅनरच्या मंजूर नकाशानुसारच दस्त नोंदणी करण्यात यावी. असे आदेश काढल्याने आधी होत असलेल्या गैरकायदेशीर व सार्वजनिक हिताची जागा योग्य प्रमाणात राहणार असल्याने प्लॉटविक्री व नोंदणीस आळा बसणार आहे.