आता प्रत्येक मिठाई ट्रे समोर असेल ‘बेस्ट बिफोर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:11+5:30
हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मिठाई निकृष्ट दर्जाची दिली, जुनी दिली, त्यात किडे आढळले किंवा मिठाई खाल्यानंतर विषबाधा झाली अशी अनेक प्रकरणे आपल्या कानावर पडली आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी तसेच ग्राहकांना ती मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी तारीख म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनानचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी या संदर्भात पत्र काढले आहे. या नियमाची अमंलबजावणी १ ऑक्टोंबरपासून न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते. अशी अनेक उदाहरणे समोर येतात. परंतु या प्रकारासंदर्भात एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला म्हटल्यावर ते आपला हात झटकतात. हे होऊ नये यासाठी आता प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व मिठाई उत्पादक विक्रेत्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रेववर ‘बेस्ट बिफोर’ ठळक अक्षरात लिहिणे १ ऑक्टोंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.
मिठाई किती दिवस खाण्यायोग्य याची मिळेल माहिती
अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारी नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी दिनांक १ आॅक्टोबर २०२० पासून महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ग्राहकांना ती मिठाई किती दिवसपर्यंत खाणे योग्य राहते याची कल्पना येईल. त्यामुळे अन्न विषबाधा सारख्या अप्रिय घटना टाळता येऊ शकतील.
या नियमासंदर्भात सर्व दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व मिठाई विक्रेत्यांनी या तरतूदीचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांच्याविरूद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
-अभय देशपांडे,
सहाय्यक आयुक्त अन्न भंडारा/गोंदिया.