आता घरगुती बैठकांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 12:46 AM2017-01-06T00:46:47+5:302017-01-06T00:46:47+5:30
नगर परिषद निवडणुकीचा ज्वर वाढला असून प्रचाराच्या रणधुमाळीने शहर दणाणून गेले आहे. असे
गल्लोगल्ली आयोजन : उमेदवार घरोघरी
गोंदिया : नगर परिषद निवडणुकीचा ज्वर वाढला असून प्रचाराच्या रणधुमाळीने शहर दणाणून गेले आहे. असे असताना आता मात्र उमेदवारांच्या घरगुती बैठकींना उधान आले आहे. गल्ली-गल्लीतील लोकांच्या घरात बैठका घेऊन उमेदवार मतदारांशी जवळील साधत आहे. त्यामुळे उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जावून भेटी घेत असल्याचे दिसत आहे.
महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी शहरात बघावयास मिळत आहे. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी य कालावधीत कधी घरोघरी जाऊन तर कधी रॅलीतून मतदारांची भेट घेतली आहे. शिवाय प्रचारकार्यही जोमात सुरू असून उमेदवार मतदारांच्या सतत नजरेसमोर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठीच जमेल त्या प्रकाराचा अवलंब उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र आता मतदानासाठी जेमतेम एकच दिवस उरला आहे. त्यामुळे उमेदवार दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त उमेदवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
निवडणूक जसजशी जवळ-जवळ येत आहे. तसतशी उमेदवारांची धावपळ वाढली आहे. त्यात पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठका घेत आहेत. यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. यातून काही वेळ काढून आपल्या लोकांची भेट घेण्यासाठी उमेदवार घरगुती बैठकांचे आयोजन करीत आहेत. यासाठी एखाद्या गल्लीतील काही घरांच्या महिलांची तसेच पुरूषांची बैठक घेऊन त्यांची भेट घेऊन मतांचा जोगवा मागीतला जात आहे. याबैठकीसाठी आपल्या जवळील व्यक्तीच्या घरीच सर्वांना एकत्र केले जात आहे.
सध्या अशा या घरगुती बैठकांनाच जोम आला आहे. या भागातील बैठक आटोपली की लगेच दुसऱ्या भागात बैठकांचे आयोजन सुरू आहे. उरलेल्या दिवसांत मतदारांसोबत काही वेळ बसून उमेदवार मतांचे राजकारण करीत आहेत. प्रचारकार्य सध्या सर्वच उमेदवारांचे सुरू आहे. मात्र लोकांच्या मधात बसून त्यांच्यासोबत बोलचाल करून त्यांचे मत आपल्याकडे पाडून घेण्यासाठी हा नवा फंडा उमेदवार अवलंबीत आहेत.
सर्व सुविधा उमेदवारांक डून
४या घरगुती बैठकीसाठी सर्व सुविधा उमेदवाराकडून पुरविल्या जात आहेत. फक्त बैठकीची जागा ठरल्यावर उमेदवाराचे कार्यकर्ते बैठकीच्या जागेची साफसफाई करण्यापासून बसण्याची व्यवस्थाही करीत आहेत. शिवाय बैठकीत आलेल्या लोकांच्या चहा व नाश्त्याचीही व्यवस्था उमेदवार करीत आहेत. ही सर्व धडपड फक्त मतांसाठी असून लोकांशी जवळीक साधण्याचा हा उत्तम फंडा असल्याने उमेदवारांचा जोर आता याकडे जास्त दिसत आहे.
भाजपचे तीन पदाधिकारी निष्कासित
४गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्र्वभूमिवर पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या भाजपाच्या ३ पदाधिकाऱ्यांवर निष्कासनाची कारवाई जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. निष्कासीत केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंदियातील एजाज खान पठान, तिरोड्यातील वनमाला डहाके व सुनील येरपुडे यांचा समावेश आहे.