आता गावा-गावांत होणार ग्रामसुरक्षा दलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:22+5:302021-03-09T04:32:22+5:30
याप्रसंगी पोलीसपाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, उपाध्यक्ष अनिता लंजे, उमेश वाढई यांच्यासह पोलीसपाटील उपस्थित होते. ...
याप्रसंगी पोलीसपाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, उपाध्यक्ष अनिता लंजे, उमेश वाढई यांच्यासह पोलीसपाटील उपस्थित होते. तालुक्यातील काही गावांमध्ये घरफोडी, विद्युत पंपचोरी व पेट्रोल महाग झाल्यामुळे पेट्रोलचोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावच्या सुरक्षेकरिता ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत आहे. याप्रसंगी सचिन बांगडे यांनी सांगितले गावची सुरक्षा ग्रामसुरक्षा दलाच्या हाती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आपण स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. स्थापना करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना मार्गदर्शन करू. लोकसंख्येच्या मानाने पोलीस विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने लोकांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे आपले गाव आपली सुरक्षा या पोलीस विभागाच्या संकल्पनेस सहकार्य करावे सांगितले. याप्रसंगी भृंगराज परशुरामकर यांनी यापूर्वी गोंदिया जिल्हा तंटामुक्त जिल्हा ही चळवळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्या संकल्पनेचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण झाले. गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना पोलिसांचा माणूस म्हणून ओळख मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारावर वचक बसून गुन्ह्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. आपले गाव सुरक्षित राहील, असे सांगितले.