आता दोन शोषखड्ड्यांच्या शौचालयावरच मिळेल अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:23 AM2019-01-12T01:23:30+5:302019-01-12T01:24:35+5:30
नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात भरघोष प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत आता तयार ...
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात भरघोष प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत आता तयार होणार होणाऱ्या शौचालयांसाठी दोन शोषखड्डे तयार करणे आवश्यक आहे. दोन शोष खड्डे तयार केल्यानंतरच लाभार्थ्याला अनुदान दिला जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आधारभूत सर्वेक्षण २०१२ नुसार १८ हजार ३०८ कुटुंबांना शौचालय तयार करण्याची मंजुरी मिळाली आहे. या शौचालयाचे बांधकाम ३१ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शौचालयासह दोन शोषखड्डे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समितीची परिस्थती वेगवेगळी आहे. सेप्टीक टँंक व एक शोषखड्याच्या शौचालयाच्या तुलनेत दोन शोषखड्यांचे शौचालय अधिक उपयोगी आहे. सेप्टीक टँक व एक शोषखड्याच्या तुलनेत दोन शोषखड्याचे शौचालय तयार करायला जागाही कमी वेळही कमी लागतो. शोषखड्याच्या शौचालयातून दुर्गंधीमुक्त खत मिळते. याप्रकारे सेप्टीक टँकमधून बाहेर निघणाºया विष्ठेमुळे घाण पसरते. परिणामी आजार पसरतो. सेप्टीक टँकच्या विष्ठेच्या व्यवस्थापनात अनेक समस्या येतात. या व्यतिरिक्त सेप्टीक टँकमधून बाहेर निघणाºया विष्ठा व्यवस्थापनाला खर्चही अधिक येते. एक शोषखड्डा शौचालयाचा तो खड्डा भरल्यावर शौचालयाचा उपयोग करणे बंद केले जाते. त्यानंतर लोक उघड्यावर शौचास जाणे सुरू करतात.परंतु दोन शोषखड्डे असलेल्या शौचालयाचा एक शोषखड्ड भरल्यावर दुसºया शोषखड्याचा उपयोग होत असतो.या दोन्ही कारणामुळे दोन्ही शोषखड्यांचा उपयोग होऊ शकतो. नेमकी हीच बाब हेरून आधारभूत सर्वेक्षण २०१२ पासून सुटलेल्या ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत अश्यांसाठी शौचालयाचे काम करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आता दोन शोषखड्डे असलेले शौचालय तयार करणे आवश्यक करण्यात आले. दोन शोषखड्याच्या शौचालयांना अनुदान मंजूर केले जाणार आहे. दोन शोषखड्यांच्या शौचालयात रूरल पॅन बसविण्यात येणार आहे.
शोषखड्डे ४ फूट खोल असणे आवश्यक आहे. दोन्ही खड्यांमधील अंतर २ ते ३ फूट असणे आवश्यक आहे. रूरल पॅन दोन्ही शोषखड्यांच्या मधात २ ते ३ फूट अंतर असणे आवश्यक आहे. रूरल पॅन २५ ते ३० डिग्री उतारावर बसविणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत कमीत-कमी १५ मीटर दूर अंतरावर शौचालय असावे. शोषखड्ड्यात वेंट पाईप बसवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिकाºयांची तळमळ
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांच्या प्रयत्नाने जिल्हा पूर्वीच उघड्यावरील शौचमुक्त झाला. यासाठी जि.प. चे मुकाअ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: पहाटेच गावागावात पोहचतात. लोकांना मार्गदर्शन करतात.लोकांनी शौचालय तयार केले नाही त्यांना समजाविण्यात आले. दोन्ही अधिकाºयांच्या प्रयत्नामुळे ते गोंदिया जिल्ह्याचे चित्र बदलू पाहात आहेत.
१८ हजार ३०८ नवीन शौचालयांना मंजुरी
जिल्ह्यात १८ हजार ३०८ नवीन शौचालयांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु हे सर्व शौचालय दोन शोष खड्यांचे असतील. मंजूर झालेल्या शौचालयात गोंदियात सर्वाधिक ३ हजार ८८३, तिरोडा ३ हजार ३५७, गोरेगाव २ हजार ९३४, अर्जुनी-मोरगाव २ हजार १९१, देवरी २ हजार २०, सालेकसा १ हजार ५४३, आमगाव १ हजार २८६ व सडक-अर्जुनी तालुक्यातील १ हजार ९४ शौचालयांचा समावेश आहे.