आता ३१ तारखेला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:37 PM2017-08-20T21:37:14+5:302017-08-20T21:37:38+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानांतरणाला घेऊन धान्य बाजार अडत्या व्यापारी असोसिएशन व बाजार समिती प्रशासनात सुरू असलेल्या वादाला घेऊन शुक्रवारच्या सुनावणीत (दि.१८) पणन मंडळाने (पुणे) ३१ तारखेला सुनावणी ठेवली आहे.

 Now hearing on 31 st date | आता ३१ तारखेला सुनावणी

आता ३१ तारखेला सुनावणी

Next
ठळक मुद्देपणन मंडळाने तारीख वाढविली : व्यापाराला घेऊन आज होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानांतरणाला घेऊन धान्य बाजार अडत्या व्यापारी असोसिएशन व बाजार समिती प्रशासनात सुरू असलेल्या वादाला घेऊन शुक्रवारच्या सुनावणीत (दि.१८) पणन मंडळाने (पुणे) ३१ तारखेला सुनावणी ठेवली आहे. मंडळाने जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू करण्याचे आदेश दिल्याचे अडते सांगत आहेत. त्यामुळे आता सोमवारी (दि.२१) जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू होतो किंवा नाही हे बघायचे आहे.
बाजार समिती प्रशासनाने जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नव्या यार्डात स्थानांतरण केले. याला मात्र अडत्यांचा विरोध असून नवीन यार्डात सर्व सुविधा उपलब्ध करवून दिल्यावरच नवीन यार्डात जाणार अशी त्यांची मागणी आहे. स्थानांतरणाच्या या विषयाला घेऊन उच्च न्यायालयाने (नागपूर) आपसी सामंजस्याने हा प्रश्न मिटविण्याचे आदेश दोन्ही पक्षांना दिले. यावर मात्र अडत्यांनी उच्च न्यायालयाच्या परवानगीने पणन मंडळाकडे दाद मागीतली. प्रकरणी मंडळाने शुक्रवारी (दि.१८) सुनावणी ठेवली होती.
या सुनावणीत अडत्या असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल व सदस्य प्रवीण अग्रवाल तर बाजार समिती प्रशासनाकडून उपसभापती धनलाल ठाकरे व सचिव सुरेश जोशी तसेच जिल्हा उप निबंधक कार्यालयाकडून सहायक निबंधक देवीदास घोडीचोर उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाने सुनावणीची तारीख वाढवून ३१ आॅगस्ट रोजी ठेवली असतानाच संबंधीतांना जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू करण्याचे आदेश दिल्याचे अडत्या असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी पत्रकातून कळविले. त्यामुळे आता सोमवारी (दि.२१) जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू होतो किंवा नाही. तसेच अडते व बाजार समिती प्रशासन काय भूमिका घेतात हे सोमवारीच स्पष्ट होणार.
असे आदेश नाहीत
पणन मंडळाने बाजार समिती उपसभापती व सचिव तसेच सहायक उप निबंधक यांना जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू करण्याचे आदेश १८ तारखेच्या सुनावणीत दिल्याचे अडते सांगत आहेत. तर दुसरीकडे मात्र उपसभापती ठाकरे व सचिव जोशी यांनी असे काहीच आदेश देण्यात आले नसल्याचे सांगीतले. त्यामुळे जुन्या बाजार समितीत व्यापार सुरू होणार नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. अशात आता सोमवारी (दि.२१) हे प्रकरण काय वळण घेते हे तर सोमवारीच दिसेल.

Web Title:  Now hearing on 31 st date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.