आता केंद्रस्तरीय समितीची ‘व्हिजिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:43 PM2017-08-19T21:43:37+5:302017-08-19T21:43:57+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) हागणदारीमुक्त झालेल्या गोंदिया शहरातील हागणदारी मुक्ततेबाबत पाहणी करण्यासाठी आता केंद्रस्तरीय समिती येणार आहे.

 Now the Visitor of the Central Committee | आता केंद्रस्तरीय समितीची ‘व्हिजिट’

आता केंद्रस्तरीय समितीची ‘व्हिजिट’

Next
ठळक मुद्देलवकरच येणार पाहणीला : नगर परिषदेने माहिती पाठविली

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) हागणदारीमुक्त झालेल्या गोंदिया शहरातील हागणदारी मुक्ततेबाबत पाहणी करण्यासाठी आता केंद्रस्तरीय समिती येणार आहे. यासाठी नगर परिषदेने शहरातील शौचालयांबाबतची माहिती राज्य संचालक (नागरी) स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्याकडे पाठविली आहे. राज्यस्तरीय समितीनंतर आता केंद्रस्तरीय समिती येणार असल्याने नगर परिषद स्वच्छता विभाग कामाला लागला आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाºया या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत.
गोंदिया शहर जिल्ह्याचे ठिकाण असले तरी आजही येथील कित्येकांकडे वैयक्तीक शौचालय नाहीत. ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचाचा प्रकार असतो हे खरे नाही. कारण शहरातही उघड्यावर कमी मात्र सार्वजनिक शौचालयांचा आधार वैयक्तीक शौचालय नसलेल्या परिवारांना घ्यावा लागत असल्याचे सत्य आहे. या प्रकारावर पूर्णपणे विराम लागावा व प्रत्येकाकडे वैयक्तीक शौचालय असाणे गरजेचे आहे. याच उद्देशातून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविले जात आहे. यांतर्गत शहरात शौचालय बांधकाम करण्यात आले असून काही सुरू आहेत. याचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती पाहणी करून गेली आहे.
मात्र आता केंद्रस्तरीय समिती पाहणीसाठी येणार आहे. या समितीला पाहणी करता यावी यासाठी मागीतल्याप्रमाणे नगर परिषदेने स्वछ महाराष्ट्र अभियान (नागरी) राज्य संचालकांकडे शहराची माहिती पाठविली आहे.
आता ही समिती शहराच्या पाहणीसाठी कधी येते हे अद्याप स्पष्ट नसले तरिही लवकरच समिती येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगर परिषदही समितीची वाट बघत आहे.

माहितीचा १७ पानांचा अहवाल
नगर परिषदेने राज्य संचालकांना पाठविण्यासाठी तयार केलेल्या माहितीचा १७ पानी अहवालाचा बंच तयार झाला आहे. यामध्ये शहरातील झोपडपट्टी किती, त्यातील घरे,शौचालय, सार्वजनिक शौचालय; रेल्वे मार्गालगत झोपडपट्टीची माहिती; रहिवासी क्षेत्रातील घरे व शौचालयांची माहिती; अस्तीत्वातील सार्वजनिक शौचालय; भाजी बाजारातील सार्वजनिक शौचालय; बसस्थानक व रेल्वे स्थानकांवरील शौचालय; धार्मिकस्थळांलगत शौचालय; प्ले-ग्राऊंड व बगिचे; नाले व बोड्या; उघड्यावर शौचालय करतात त्या जागा; अभियानाला घेऊन प्रसिद्धीबाबतची माहिती; शाळांतील शौचालय आदि बाबत महिती आहे.

Web Title:  Now the Visitor of the Central Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.