आता स्त्रिया व्यासपीठावर बोलू लागल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:05 AM2018-04-19T01:05:33+5:302018-04-19T01:07:28+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे आज माझ्यासारख्या स्त्रियांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन सौंदडच्या सरपंच गायत्री इरले यांनी केले.
त्रिरत्न बौद्ध विहार समिती श्रीरामनगर (सौंदड) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
अनावरण मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते, राजेश नंदागवळी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय लांजेवार, रत्नदीप दहिवले, जि.प. सदस्य रमेश चुºहे, सरपंच भरत पंधरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य देवचंद तरोणे, शिवदास साखरे, सुखदास मेश्राम, प्रा. सिद्धार्थ रामटेके, केवळराम रहिले, प्रा.आर.के. भगत, अनिल मेश्राम, सरपंच गायत्री इरले, सरपंच रेखा चांदेवार उपस्थित होते.
या वेळी मूर्तीदाता रायवंता शंकर रामटेके आणि चित्ररेखा विलास रामटेके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन महिलांनी दोन प्रतिमा दान केल्यामुळे सर्व उपस्थित नागरिकांनी त्यांचा गौरव केला. श्रीनगर येथे बौद्ध धम्मीय फक्त चारच घरे आहेत. अशा कमी लोकसंख्येच्या गावात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी याकरिता गावकऱ्यांनी केलेले सहकार्य उल्लेखनिय असल्याचे मत मान्यवरांनी मार्गदर्शनातून व्यक्त केले. यावेळी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर अतिथींनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पुरुषोत्तम रामटेके यांनी मांडले. संचालन कैलास रामटेके यांनी केले. आभार विलास रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी सत्यवान तिरपुडे, प्रेमराज बन्सोड, गौतम रामटेके आदींनी सहकार्य केले.