न.प.कर्मचारी, कंत्राटदारांना मिळणार थकीत रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:12 AM2017-10-15T00:12:37+5:302017-10-15T00:13:33+5:30
येथील नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम तसेच नगर परिषदेच्या लघु कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे देयके नगर परिषदेकडे थकीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम तसेच नगर परिषदेच्या लघु कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे देयके नगर परिषदेकडे थकीत होते. त्यातच दिवाळी सण तोंडावर असल्याने या कर्मचाºयांचे थकीत वेतन आणि कंत्राटदाराचे देयके देण्यात यावे. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या रक्कमेतून ३ कोटी ५० लाख रुपये थकीत वेतन आणि देयकासाठी वापरण्यासाठी परवानगी दिली.
येथील नगर परिषदेचे नियमित व रोजंदारी कर्मचारी गेल्या काही महिन्यापासून वेतन मिळाले नाही. तसेच कंत्राटदारांची देयक थकीत असल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले होते. त्यात दिवाळीचा सण तोंडावर असल्याने वेतन न मिळाल्याने तो साजरा कसा करायचा अशी समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. ही समस्या ओळखून काँग्रेस गटनेता शकील मन्सुरी व मुख्याधिकारी चंदन पाटीेल यांनी कर्मचारी आणि कंत्राटदारांचे थकीत रक्कम देण्यासाठी नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या निधीतून ३ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम देण्याची परवानगी देण्याची मागणी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून शासनाकडे केली. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाºयांवर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेत अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन नगर परिषदेचीे अडचण लक्षात आणून दिली. तसेच नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी चर्चा करुन कर्मचारी आणि कंत्राटदारांची समस्या लक्षात आणून दिली. तसेच नगर परिषदेला ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्री फडणविस यांच्या निर्देशानंतर नगर विकास विभागाने गोंदिया नगर परिषदेला ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वापरण्याबाबतच्या परवानगीचे पत्र दिले. त्यामुळे आता नगर परिषद कर्मचाºयांचे थकीत वेतन, सेवानिवृत्त कर्मचाºयांची रक्कम आणि कंत्राटदारांची थकीत देयके देण्याची समस्या मार्गी लागणार आहे. याच निधीतून २१ लाख रुपयांच्या शहरातील पथदिव्यांचे थकीत देयकाचा भरणा केला जाणार आहे.
कर्मचाºयांची दिवाळी आनंदात
नगर विकास विभागाने नगर परिषदेकडे व्याजाच्या स्वरुपात जमा असलेल्या रक्कमेतून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे थकीत वेतन, फेस्टीव्हल अॅडव्हाँसची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचाºयांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
नगरसेवक, अधिकाºयांनी मानले आभार
नगर परिषदेला आर्थिक संकटातून मार्ग काढून दिल्याबद्दल आ.गोपालदास अग्रवाल यांचे काँग्रेस गट नेता शकील मन्सुरी, मुख्याधिकारी चंदन पाटील, माजी सभापती राकेश ठाकूर, सुनील तिवारी, सुनील भालेराव, दिपीका रुसे, निर्मला मिश्रा व नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जहीर अहमद यांनी आभार मानले आहे.