राजकीय सुडातून न.प.ने अडविली विकास कामे
By admin | Published: September 25, 2016 02:33 AM2016-09-25T02:33:20+5:302016-09-25T02:33:20+5:30
राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत.
गोपालदास अग्रवाल : भवानी मंदिर-सूरज चौक रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
गोंदिया : राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत. यामुळेच भुयारी गटार योजना रद्द होवून ५० कोटींपेक्षा जास्तीचा निधी परत जाणार आहे. जनतेने ज्या नगरसेवकांना शहराला सुरळीत चालविण्याची व विकासाची जबाबदारी दिली, नगर परिषदेचे तेच पदाधिकारी शहराचा विकास रोखून बसले आहेत. यावर नागरिकांनी गांभीर्याने विचार करून शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी काम करणाऱ्यांना निवडून द्यावे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
राज्य शासनाच्या वैशिष्टपूर्ण कार्य योजनेंतर्गत १५० लाखांच्या निधीतून मंजूर भवानी चौक ते सूरज चौक रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार अग्रवाल पुढे बोलताना म्हणाले, भवानी मंदिरात वाजपेई चौक रस्ता सिमेंटीकरणासाठी दलितोत्तर योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर करण्याबाबत नगर परिषदेने ठराव घेतला नाही. मात्र जिल्हा नियोजन समितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहुतमाच्या आधारे निधी मंजूर करविला. उर्वरित सूरज चौक ते भवानी मंदिर रस्ता सिमेंटीकरणासाठी आम्ही राज्य शासनाकडून निधी आणला. मात्र राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत, असे ते म्हणाले.याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, गट नेता राकेश ठाकूर, राष्ट्रवादीचे गट नेता पंकज यादव, शिक्षण समिती सभापती शिला इटानकर, नगरसेवक दारा बैरिसाल, निर्मला मिश्रा, सीमा भालेराव, भगत ठकरानी, व्यंकट पाथरू, सुनिल भालेराव, सनी शेंद्रे, जियंदराम आयलानी, माधवदास खटवानी, नरेंद्र चांदवानी, हरीराम मोटवानी, नरेश् चावला, सुनिल छावडा, कमल लालवानी, संजू मनूजा, आनंद महावत, मुकेश् बिरीया, मुकेश नायक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)