न.प.ने झोपेत काढल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:43 PM2018-03-26T22:43:17+5:302018-03-26T22:43:17+5:30

नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजाविल्याने सोमवारी (दि.२६) अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

NP notice issued in sleep | न.प.ने झोपेत काढल्या नोटीस

न.प.ने झोपेत काढल्या नोटीस

Next
ठळक मुद्देअतिक्रमण नसलेल्यांना बजावली नोटीस : अतिक्रमण मोहिमेदरम्यान तणाव

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजाविल्याने सोमवारी (दि.२६) अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नगर परिषदेने झोपेत नोटीस काढल्या का? असा संप्तत सवाल नागरिकांनी केला. या प्रकारामुळे नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबविण्याची वेळ आली.
नगर परिषदतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी अतिक्रमण स्थळांची मोजणी करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. शहरातील कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंतच्या मार्गाची मोजणी पूर्ण झाल्याने नगर परिषदेने सदर अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून सोमवार (दि.२६) पासून अतिक्रमण हटाव मोहीमेला कुडवा चौकातून सुरूवात केली. दरम्यान जुन्या टि.बी.रूग्णालयासमोरील अतिक्रमण हटविण्यात आले. याच परिसरात वनविभागाचे कार्यालय असून या कार्यालयाची सुरक्षा भिंत अतिक्रमणात येत असल्याचे सांगत नगर परिषद नगररचना विभागाने त्यांना नोटीस बजावली. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान सुरक्षा भिंत पाडण्यात आली नाही. तेव्हा इतर अतिक्रमणधारकांनी यावर आक्षेप घेतला. तसेच वन विभागाची सुरक्षा भिंत देखील अतिक्रमणात येत असून त्यांना सुध्दा नोटीस बजाविण्यात आली असल्याचा पुरावा सादर केला. तेव्हा भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाची सुरक्षा भिंत अतिक्रमण क्षेत्रात येत नसून त्यांना नोटीस कुणी बजावली असा सवाल न. प. मुख्याधिकारी चंदन पाटील यांना केला. ज्यांचे अतिक्रमण नाही त्यांना कशा नोटीस बजाविल्या असा सवाल उपस्थित केला. त्यावर नगररचना विभागाने नोटीस काढल्या असून या विभागाच्या कर्मचाºयांची ही चूक असल्याचे सांगितले. मात्र या घोळामुळे न.प.ला अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबविण्याची पाळी आली. नियमानुसार ज्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांचे अतिक्रमण काढा अशी भूमिका इतर अतिक्रमण धारकांनी घेतल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा या भागातील जागेची मोजणी करुन अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र नगररचना विभागाच्या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे न.प.ला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली.
मोहिमेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न
भूमिअभिलेख विभागाने कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंत भागाची मोजणी करुन या भागातील अतिक्रमणधारकांची यादी तयार करुन नगररचना विभागाकडे पाठविली. मात्र नगररचना विभागाने यादीत समावेश नसलेल्या वन संरक्षक कार्यालय व इतर काही जणांना नोटीस बजावली. त्यामुळे मोहीमेदरम्यान अधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला अधिकाºयांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेत बाधा निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप भूमिअभिलेख विभागाच्या एका कर्मचाऱ्याने केला.
मोहिमेदरम्यान दुजाभाव
कुडवाचौक ते एनएमडी कॉलेज परिसरातील अतिक्रमण हटविताना न.प. कडून काही अतिक्रमणधारकांना सुट देण्यात आल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. काही अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीस बजावली होती. प्रत्यक्षात मोहीमेदरम्यान त्यांचे अतिक्रमण काढले नसल्याचा आरोप केला.
विभागात समन्वयाचा अभाव
नगर परिषद, नगररचना आणि भूमिअभिलेख या तिन विभागाच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमणीत भागाची मोजणी करुन नोटीस बजाविण्याचे काम सुरू आहे. भूमिअभिलेख विभागाने जागेची मोजणी करुन ज्यांनी शासकीय जागेवर बांधकाम केले आहे. त्यांना नोटीस बजाविण्यासाठी यादी तयार करुन नगररचना विभागाला दिली होती. मात्र नगररचना विभागाने ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजावली. त्यामुळे या विभागांमध्ये समन्वय नसल्याचे अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान दिसून आले.

Web Title: NP notice issued in sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.