बिबट्या शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:54+5:302021-01-20T04:29:54+5:30

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेताजवळ करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. ही घटना ३ व ४ ...

The number of accused in leopard poaching cases will increase | बिबट्या शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार

बिबट्या शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार

Next

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेताजवळ करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. ही घटना ३ व ४ जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणात हेतराम मधू गावळ (वय ३८, रा. इंदिरानगर तिल्ली), देवराम श्यामलाल नागपुरे (३०, रा. चोपा, बाजारटोला), लिंगम रमेश येरोला (५५, रा. चोपा बाजारटोला, हेतराम गणपत मेश्राम (४१, रा. चोपा बाजारटोला) या चौघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

इंदिरानगर तिल्ली येथील देवानंद सोनवाने यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट्या विहिरीत आढळला. या बिबट्या वन्यप्राण्याचा मृत्यूचा कारणांचा शोध घेत असता ४ जानेवारी त्याच घटनास्थळालगत लागून असलेल्या जंगलात झुडपामध्ये दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. जवळच निलगायचे अवषेश आढळले होते. एका बिबट्याचे मुंडके कापून आरोपींनी गौरीटोला ते चांगोटोला दरम्यान असलेल्या पांगोली नदीच्या पाण्यात फेकले होते. ते मुंडके १८ जानेवारी रोजी आरोपी हेतराम मधू गावळ (३८) याने वनाधिकाऱ्यांना ती जागा दाखवून ते मुंडके पांगोली नदीच्या पात्रातून हस्तगत करण्यात आले. दात, मिशी यांच्यासह असलेले मुंडके हे वनविभागाने जप्त केले आहे. लिंगम याने गावातीलच मन्साराम यांच्या घरी लपवून ठेवलेली चार नखे जप्त करण्यात आली. या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. वनकोठडीत असलेल्या आरोपींची वनाधिकारी कसून चौकशी करीत असताना या प्रकरणात आणखी आरोपी अडकण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींच्या मागावर वनाधिकारी आहेत.

Web Title: The number of accused in leopard poaching cases will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.