गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या ४०० च्या घरात पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:02 PM2020-06-25T12:02:00+5:302020-06-25T12:07:20+5:30

वृक्ष लागवडीच्या नादात काळविटांचे अधिवास वनविभागाने व शासनाने संपविले आहे.

The number of antelopes in Gondia district is around 400 but ... | गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या ४०० च्या घरात पण...

गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या ४०० च्या घरात पण...

Next
ठळक मुद्देवृक्ष लागवडीने संपविला काळविटांचा अधिवासपाच ते सहा ठिकाणी काळविटांचा अधिवासप्रत्येक ठिकाणी ७० ते ८० काळवीट

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वन्यप्राण्यांत शेड्यूल वनमध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काळविटची संख्या ३०० ते ४०० च्या जवळपास आहे.एकीकडे त्यांच्या संवर्धनासाठी वन्यप्रेमींची तळमळ सुरू आहे. मात्र दुसरीकडे काळविटांचे अधिवास असलेले माळरान दिवसेंदिवस कमी होत आहे. वृक्ष लागवडीच्या नादात या काळविटांचे अधिवास वनविभागाने व शासनाने संपविले आहे. या वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी माळरान बचावचा नारा सेवा संस्थेने दिला आहे.
वन्यजीवांमध्ये आकर्षित करणारा काळवीट प्राणी राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळवीट वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. उजाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन वनविभाग करीत असला तरी याच वनाजवळील माळरानात वावरणाºया काळवीट प्राण्यांचे अधिवास संपत चालले आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेताकडे वळत आहेत. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असली तरी त्यांना वावरण्यासाठी पुरेसे माळरान नसल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता. या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य केले गेल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचे अधिवास टिकून आहे. उजाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु तसे होत नाही. त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले. बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले.सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु हे माळरान गावाच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा डोळा या प्राण्यांवर असते. काळविटांची वाढती संख्या पाहुन त्यांच्यासाठी पुरेशे माळराण उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा मोर्चा शेताकडेही वळतो. परिणामी शिकार केली जाते. आधी मोठ्या प्रमाणात काळविटांची शिकार व्हायची. परंतु या संदर्भात वनविभागाने व निसर्ग मंडळाने मागील ९ वर्षापासून केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. सैरावैरा शेताकडे पळणाºया या प्राण्यांची फासे टाकून,विज टाकुन शिकार केली जाते. या काळविंटाकरीता शासनाने माळरान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
अपघाताचे प्रमाण झाले कमी
जिल्ह्यात काळवीट पाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र या पाचही परिसरातून मोठे रस्ते गेल्यामुळे भ्रमण करताना महिन्याकाठी दोन काळवीट अपघातात मृत्यूमुखी होते. परंतु आता अपघाताचेही प्रमाण कमी झाले आहे. चुलोद, नवरगाव, दतोरा, दागोटोला व अदासी परिसरापासून ते गोरेगाव तालुक्याच्या काही भागात पसरलेल्या क्षेत्रात काळवीट आढळतात.
ठेवला जातोय वॉच
काळवीट बरोबर कुरणावर वावरणाºया लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाºया लांडग्यांची संख्या आता बरीच वाढली आहे. या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने वॉच टॉवर उभारले आहे. त्या टॉवर वरून त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे.

काळविटांसाठी असलेले माळरान संरक्षित क्षेत्र घोषित करून त्याच्या उत्थानासाठी व कुरण निर्मितीसाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. स्वातंत्र संग्राम सैनिक व माजी सैनिकांना वनविभागाच्या माळरानाची जागा न देता त्यांना दुसºया ठिकाणी जागा देण्यात यावी.माळरानाचे जंगल करू नका.
- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया.

Web Title: The number of antelopes in Gondia district is around 400 but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.