बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:52+5:302021-05-19T04:30:52+5:30

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी ...

The number of victims increased again after four days | बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत वाढ

बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत वाढ

googlenewsNext

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. मात्र बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८) ३१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर १९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चार बाधितांचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मंगळवारी आढळलेल्या १९० रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव ३०, सालेकसा १६, देवरी २८, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १५, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४५,८६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२०,८९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,४०० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२६,७८० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,६५१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३६,२५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,७५५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

आतापर्यंत २ लाख ९३ हजार २६१ चाचण्या

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी नागरिक आता स्वत:हून पुढे येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९३ हजार २६१ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी २ लाख ४७ हजार ६७७ नमुने निगेटिव्ह आले आहे.

..........

बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच

कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असला बाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र कायमच आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यू दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बाधितांचा मृत्यूदर १.६२ टक्के आहे.

.............

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्क्यांवर

एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख चांगलाच उंचावला होता. तर मात करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ३२ टक्क्यांवर गेला होता. पण मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट होत असल्याने हा दर आता १८ टक्क्यांवर आला आहे.

Web Title: The number of victims increased again after four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.