नंबरप्लेट झाले शो-पीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:30 PM2019-05-07T22:30:45+5:302019-05-07T22:31:08+5:30
नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचा क्रमांक लिहिलेला असावा. परंतु शहरात शो-पीससारखे भासणारे नंबर प्लेट असणारे अनेक वाहन निर्भयतेने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यावर नंबरसुद्धा अशा पद्धतीने लिहिले असतात की त्यांना वाचणेसुद्धा अशक्य असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचा क्रमांक लिहिलेला असावा. परंतु शहरात शो-पीससारखे भासणारे नंबर प्लेट असणारे अनेक वाहन निर्भयतेने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यावर नंबरसुद्धा अशा पद्धतीने लिहिले असतात की त्यांना वाचणेसुद्धा अशक्य असते. या प्रकाराने हे नंबर प्लेट आहेत की शो-पीस की प्रेमाचे स्लोगन हे सांगणेसुद्धा कठीण आहे.
शहराच्या लोकसंख्या वाढीसह वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. युवा वर्गाची आवडही दुचाकी वाहनांकडे तीव्रतेने वाढत आहे. परंतु युवा वर्ग निमयांचे उल्लंघन करून विविध पद्धतीचे डिझाईन असणारे नंबर प्लेट आपल्या वाहनांवर लावत आहेत. वाहनांच्या नंबर प्लेटशी छेडछाड केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद आहे, ही बाब शहरातील बहुतांश युवकांना माहीतीच नाही. दुसऱ्या-तिसºया वाहनांचे नंबर चित्रविचित्र पद्धतीने लिहिलेले दिसते. ते समजण्यातच तीन-चार मिनिटांचा वेळ जातो. अशा अनेक गाड्यासुद्धा चालत आहेत की त्यांच्या नंबर प्लेटवरून नंबरच नष्ट झाले आहेत. अनेक वाहनांवर चुकीच्या पद्धतीने नाव व स्लोगन लिहिलेले आढळते.
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बघितले तर ही सर्वात मोठी धोक्याची घंटी आहे. यावरून वाहतूक किती योग्य पद्धतीने सुरू आहे, याचा अंदाज बांधला जावू शकतो. अशा फॅँसी नंबर प्लेट असणाºया वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नंबर प्लेटमध्ये बदल किंवा ते फॅँसी असणे यामुळे अपघात करून पळून जाणाºया आरोपीच्या वाहनाचे नंबर माहीती होत नाही, ही मोठी समस्या आहे. अशाप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने नंबर स्पष्ट दिसण्यासाठी ते योग्य पद्धतीने लिहिले असणे गरजेचे आहे.
फॅँसी नंबर प्लेट वाहन धारकांवर मोटार वाहन नियम ४१-१७७ अन्वये १०० रूपये दंडाची तरतूद आहे. या अधिनियमानुसार, वाहतूक पोलीस कर्मचाºयास २५ फूट दूर अंतरावरून वाहनाचे नंबर स्पष्ट दिसायला हवे. काही वाहन धारक यासाठीसुद्धा आपल्या वाहनांवर नंबर लिहीत नाही, कारण त्यांना गाडी विक्री करतेवेळी सुविधा होते. काही वाहने तर विना नोंदणी व विना इंसुरंशचीच रस्त्यावर धावत आहेत. या वाहन धारकांचे म्हणणे आहे की, वाहन विक्री करतेवेळी सरळ रजिट्रेशन खरेदीदाराच्या नावाने केल्यास काही प्रमाणात टॅक्सचे रूपये वाचतात. हे सर्व प्रकार बघता वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने अशा वाहन धारकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.