छोटा गोंदिया परिसरात पोषण आहार कार्यक्रम उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:09+5:302021-09-04T04:34:09+5:30

गोंदिया : एस. एस. गर्ल्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोषण आहार जनजागृती आणि उद्बोधन कार्यक्रम छोटा गोंदिया ...

Nutrition program in Chhota Gondia area in full swing () | छोटा गोंदिया परिसरात पोषण आहार कार्यक्रम उत्साहात ()

छोटा गोंदिया परिसरात पोषण आहार कार्यक्रम उत्साहात ()

Next

गोंदिया : एस. एस. गर्ल्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोषण आहार जनजागृती आणि उद्बोधन कार्यक्रम छोटा गोंदिया परिसरातील नगरपरिषद शाळा आणि ग्रामीण परिसरात घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी केटीएस रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर होत्या. याप्रसंगी बी.जी. डब्ल्यू रूग्णालयातील आहार तज्ज्ञ स्वाती बंसोड, आरोग्य पर्यवेक्षक पंकज गजभिये, आरोग्य कर्मचारी आशिष बले, पानतवणे उपस्थित होते. प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कविता राजाभोज यांनी राष्ट्रीय सेवा योजना तसेच पोषण आहारासह पाहुण्यांचा परिचय दिला. बंसोड यांनी, आहार आणि पोषण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केली. तर डॉ. हुबेकर यांनी, पोषण आहाराची आज गरज कशी व किती आहे हे समजून त्यासंबंधी जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संचालन करून आभार डॉ. राजाभोज यांनी मानले. या कार्यक्रमाला एस. एस. गर्ल्स कॉलेज आणि डी. बी.सायन्स कॉलेजमधील विद्यार्थिनी तसेच नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर छोटा गोंदिया परिसरात रॅली काढण्यात आली आणि विविध पोस्टर्सच्या माध्यमातून पोषण आहाराची माहिती देण्यात आली.

Web Title: Nutrition program in Chhota Gondia area in full swing ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.