ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार लोकजागरचा मुख्य अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:12+5:302021-08-26T04:31:12+5:30

गोंदिया : केंद्र सरकारनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचं स्पष्ट नाकारलं असून, राजकीय आरक्षणदेखील धूर्तपणे काढून घेतलं आहे. त्यामुळे ‘ओबीसी ...

OBC Chief Minister, Bahujan Sarkar Lokjagar's main agenda | ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार लोकजागरचा मुख्य अजेंडा

ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार लोकजागरचा मुख्य अजेंडा

Next

गोंदिया : केंद्र सरकारनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचं स्पष्ट नाकारलं असून, राजकीय आरक्षणदेखील धूर्तपणे काढून घेतलं आहे. त्यामुळे ‘ओबीसी मुख्यमंत्री - बहुजन सरकार’ हा लोकजागर अभियानाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन ‘लोकजागर’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.

येथील संताजी लॉन सभागृहात मंगळवारी आयोजित लोकजागरच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी लोकजागरचे प्रदेश सचिव नंदकिशोर आलोने, संपर्क प्रमुख सी.एम. लोणारे, पश्चिम विदर्भ अमरावतीचे संयोजक ॲड. प्रभाकर वानखडे, डॉ. विनोद भोयर, समाजसेविका सविता बेदरकर, विचारवंत शुद्धोधन शहारे, ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष हरिश ब्राह्मणकर, प्रदेश सचिव मनिष नांदे, उमेंद्र भेलावे, महेंद्र कटाणे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून प्रा. ज्ञानेश वाकुडकर लिखित ‘समतावादी हिंदू धर्म’ या पुस्तकाचे लोकार्पण उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले. ‘५२ टक्के ओबीसी - ५२ टक्के आरक्षण’, ‘आमची जनगणना आम्हीच करणार’, ‘ओबीसी मुख्यमंत्री - बहुजन सरकार’ ही त्रिसूत्री समोर ठेवून पुढील दिशा ठरविणाऱ्या लोकजागरच्या पूर्व विदर्भ दौऱ्याची सुरुवात भंडारा जिल्ह्यापासून करण्यात आली. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी गोंदियात छोटेखानी सभा घेण्यात आली. लोकजागर ही सामाजिक संघटना आहे. सामाजिक समता, न्याय, लोकशाही यावर विश्वास असलेली आणि वरील त्रिसूत्री मान्य असलेली समाजातील बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी वगैरे सर्व समविचारी लोकांचे या दौऱ्याच्या निमित्ताने मनापासून स्वागत राहील, असे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले. ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, वर्षा भांडारकर, ओबीसी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे, विनायक येडेवार, खेमेंद्र कटरे, सी. पी. बिसेन, संतोष खोब्रागडे, पी.डी. चव्हाण, हरिश राऊत, आत्माराम तरोणे, ए.डी. शरणागत, चंद्रकात चामट, जगेश्वर पटले, हिरालाल महाजन, भजनदास बिजेवार, पुरुषोत्तम टाकरे, उदय़ पिल्लारे, यू.एन. डोलारे, सुनील भजे, अतुल सतदेवे, एस.यू. वंजारी आदी उपस्थित होते.

Web Title: OBC Chief Minister, Bahujan Sarkar Lokjagar's main agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.